शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; माघी यात्रेत पंढरपुरात संचारबंदीची शक्यता; यात्रा होणार मर्यादित स्वरूपाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

माघी यात्रा टाळली तर, पुढील यात्रा सुखरुप होतील : तेजस्वी सातपुते

पंढरपूर/सोलापूर : माघी यात्रेतील दशमी व एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत पोलीस व प्रशासनामध्ये चर्चा सुरु आहे.  माघी एकादशी दिवशी एक दिवस संचारबंदी करण्याबाबत ही चर्चा सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.  

माघी यात्रा देखील पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरते. मात्र मागील तीनही यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे या यात्रेत प्रत्येक यात्रेच्या तुलनेने अधिक प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील लोकांची पंढरीत गर्दी झाली नाही, तर कोरोनावर आपल्याला मात करता येईल. आणि पुढील यात्रा सर्वांना खूप चांगल्यारितीने करता येतील असे जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येणारी माघी यात्रा कशी असेल असा प्रश्न विचारल्यानंतर तेजस्वी सातपुते 'लोकमत'शी बोलत होत्या.

पुढे सातपुते म्हणाल्या, माघी यात्रेला ही  इतर जिल्ह्यातून दिंडी येतात. त्यातील काही दिंड्या मोठ्या असतात. यामुळे भाविकांची गर्दी पंढरपूरात होणार. अधिक कोरोनाचा प्रसार होणार. यामुळे सर्वांना कोरोनाचा धोका निर्माण होणार.  गर्दी टाळणे, अंत्यत आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनावर कन्ट्रोल आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. लवकर कोरोना मुक्त व्हायचे असेल. तर आणखी काही काळ नियम पाळणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनी देखील मंदिरात गर्दी करणे टाळले पाहीजे. त्याचबरोबर बाहेरचे लोक मंदिरात आले नाही. तर कोरोनावर आपल्याला मात करता येईल.

 यामुळे जिल्हा प्रवेश मार्ग, पंढरपूर  तालुका प्रवेश मार्गावर पोलीसांची नाकाबंदी करण्याबाबत व कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्याच्या दृष्टीने विचार सुरु आहे.  कार्तिकी व आषाढी यात्रा मर्यादित स्वरुपाची झाली. त्याचपध्दतीने माघी यात्रा देखील मर्यादित स्वरुपाची होेणे गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस