शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

मोठी बातमी; नातेपुते-शिंगणापूर महामार्ग केला बंद; जाणून घ्या नेमकं कारण ?

By appasaheb.patil | Updated: July 21, 2023 19:24 IST

रस्ता सुधारणा काम करण्याचे काम प्रगतीपथावर

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: माळशिरस तालुक्यातील डाळज-कळस-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी=पुसेसावळी ते कराड या मार्गावर रस्ता सुधारणा काम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शिंगणापूर घाट फोडून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून घाट खोदाई करताना दगड, मुरूम रस्त्यावर येऊन वाहनांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत नातेपुते-शिंगणापूर व शिंगणापूर ते नातेपुते हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांनी नातेपुते-पिंपरी-कोथाळे-शिंगणापूर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा याबाबतचा जाहिरनामा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांनी रस्ता बंद करण्याबाबत वाहतूक शाखेला पत्रव्यवहार केला होता. माळशिरस तालुक्यातील डाळज-कळस-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी=पुरेसावळी ते कराड रस्त्यावर हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या योजनेतंर्गत रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिंगणापूर घाटातील ५०० मीटर लांबीत सुधारणा करण्याचे काम अपूर्ण आहे. सध्या घाट फोडून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. घाट फोडताना दगड, मुरूम रस्त्यावर आल्यास वाहनांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने सांगितले आहे.

१५ दिवस लागणार काम पूर्ण होण्यास...

शिंगणापूर घाटात सुरू असलेले काम हे १५ दिवस चालणार आहे. शिंगणापूर घाटातील जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या वाहतूकीकरिता वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSolapurसोलापूर