शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मोठी बातमी; पंढरपुरातील पाच हॉटेल सील; पोलिसांनी केला मोठा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 09:43 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी कायद्याचे पालन न करणाऱ्या पंढरपूर शहर व तालुक्यातील ५ हॉटेलवर शुक्रवारी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी कोरोना विषयक निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाने पोलिस कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. रात्री आठच्या नंतर सुरू असलेल्या आस्थापना, हॉटेल, लॉज, बियर बार यांच्यावर अचानक धाड टाकण्याचे काम पथकामार्फत करण्यात येत आहे. 

या पथकाने पंढरपूर शहरातील सहारा परमिट रूम दोस्ती ढाबा, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी टाकळी बायपास रोडवरील मेजर कॉर्नर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी येथील गावरान तडका या हॉटेलमध्ये अचानक भेट दिली.

यावेळी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. त्या ठिकाणी स्क्रीनिंग मशीन व सॅनिटायझर उपलब्धही नव्हते.

रात्री ८ नंतर फक्त होम पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश असूनही या हॉटेलमध्ये ग्राहक दिसून आले. संबंधित हॉटेलने  ग्राहक धोरणविषयक नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याने दाखल करून हॉटेल सील करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी  २ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूर