शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यासोबत पार्टी करून हायप्रोफाईल सेवा देणे भोवले; मंगळवेढ्याचे दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 06:45 IST

तीन कैदी पलायन प्रकरणीही कारवाई अटळ; अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याची पत्रकार परिषदेत माहिती

मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा : खून प्रकरणातील आरोपीला दवाखान्यात तपासणीसाठी म्हणून जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने भरदिवसा त्याच्या घरी घेऊन जाऊन सामिष जेवणाची पार्टी करणाऱ्या त्या दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. कैद्याला जिभेचे चोचले पुरवणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या दोन पोलिसांच्या निलंबनाबाबतचे आदेश जारी केले आहेत. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या आंबे गावाचा एक आरोपी सबजेल मध्ये आहे, त्याच्या घरी दि १७ जुलै रोजी सामिष जेवणाची पार्टी होती, त्यास हजेरी लावण्यासाठी त्या दिवशी गार्ड ड्युटीवरील बजरंग माने व उदय ढोणे या दोन पोलिसांनी पोटदुखी कारण दाखवून कैद्याला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याचा बहाणा केला.  दुपारी १२.३० कारागृहातील रजिस्टर ला नोंद केली व जेलबाहेर पडताच त्याला खाजगी वाहनाने थेट त्याच्या आंबे गावी पार्टीसाठी नेण्यात आले.

तब्बल दोन तास गावी थाबुंन जेवणावर ताव मारून त्यांनी पुन्हा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय गाठले, तेथे दुपारी २.३० वाजता पोहचून एक पोटदुखीसाठी गोळी घेऊन पुन्हा जेलकडे रवाना झाले, मात्र त्या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी कारागृहात कैद्याच्या कोरोना तपासणीत तो पार्टी साठी गेलेला कैदी पॉझिटिव्ह आढळला व एकच खळबळ माजली, त्यासोबत जेवणासाठी हजर असणारे अनेकजनाच्या मनात भीतीचे काहूर माजले व अनेकांनी स्वतःहून घरात विलगिकरण करून घेतले होते, ही चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने त्या कैदी पार्टीचे बिंग फुटले.

याबाबत 'लोकमत' मध्ये गुरुवारच्या अंकात सविस्तर वृत्त येताच पोलीस दलात मोठी खळबळ माजली. या प्रकरणाची चौकशी एक दिवसात पूर्ण होऊन तात्काळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्या दोन पोलिसांवर कारवाई बाबत डीवायएसपी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सखोल चौकशी करूूनअहवाल सादर केला त्या आधारे पहिल्या टप्प्यात निलंबनाची कारवाई केली असून दुसऱ्या टप्प्यात बडतर्फीची कारवाई निश्चित आहे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस