शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळमध्ये दोन वेगवेगळ्या कारणावरून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:29 IST

दोन वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथील गुलशन नगर येथे घडली. ...

दोन वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथील गुलशन नगर येथे घडली. मोहोळ पोलिसांनी दोन्ही गटातील ११ जणांवर गुन्हे नोंदले आहेत.

याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार अब्दुल रज्जाक कुरेशी हे भावकीतील मुलीचे लग्न करून गुलशन नगर येथील भावाच्या घरी जाऊन बोलत बसले असताना काही व्यक्तींनी घरात प्रवेश करून शिवीगाळ व डोक्याला काठीने मारहाण केली. याप्रकरणी शाहीद कुरेशी, नजीम कुरेशी, रफिक कुरेशी, शहाबाज कुरेशी, आवेज शेख, शाबाद कुरेशी या सहाजणांविरुद्ध अब्दुल रज्जाक कुरेशी यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

दरम्यान दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत? की, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान नजीम कुरेशी हे कुरेशी गल्लीतील मस्जिद मध्ये नमाज पडून बाहेर आले असता रजाक फकीर कुरेशी यास दिलेल्या जनावरांचे पैसे मागितले असता तो शिवीगाळ करून निघून गेला. मात्र काही वेळातच काही लोकांना घेऊन घरासमोर मोटरसायकलवर येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील कपाटाची मोडतोड केली. याप्रकरणी रजाक फकिर कुरेशी, इब्राहिम फकीर कुरेशी, सद्दाम रज्जाक कुरेशी, गौस फकीर कुरेशी व नजीर गौस कुरेशी (रा. गुलशन नगर मोहोळ) या पाच जणांविरुद्ध नजीम कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही गटाच्या ११ जणांविरुद्ध गुन्हे नोंदले आहेत. तपास महिला हवालदार मालती नागरे करीत आहेत.