शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! पंढरपूरात डेंग्युसदृश परिस्थिती, १३,५०० घरातील पाण्याच्या साठ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 16:35 IST

पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर शहरात १७,५०० मालमत्ता व ५,००० झोपड्या आहेत. यापैकी १३,५०० घरांना समक्ष भेटी देऊन त्यांच्या घरातील पाण्याचे साठे तपासणी केली आहे.

ठळक मुद्दे९७६ घरांमध्ये साठविलेल्या पाण्यामध्ये डासअळ्या आढळून आल्यापंढरपूर शहरात बीटीआय लिक्विड फवारणी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २३ : पंढरपूर शहरात डेंग्युसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे़  पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर शहरात १७,५०० मालमत्ता व ५,००० झोपड्या आहेत. यापैकी १३,५०० घरांना समक्ष भेटी देऊन त्यांच्या घरातील पाण्याचे साठे तपासणी केली आहे. यापैकी ९७६ घरांमध्ये साठविलेल्या पाण्यामध्ये डासअळ्या आढळून आल्या. या दूषित पाण्याच्या साठ्यामध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकून डासअळ्या नष्ट करण्यात आल्या.पंढरपूर शहरातील १३०८ डासोत्पत्ती स्थानावर हातपंप व ब्लोअरद्वारे डासअळी प्रतिबंधक फवारणी करण्याचे काम चालू आहे. फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात येत आहे. शहरात ३७ ठिकाणी २१८ व ७६०० शौचालयामध्ये बीटीआय लिक्विड फवारणी करण्यात  आली आहे. कंटेनर सर्व्हेच्या माध्यमातून ९६० टायर्स जप्त केले आहेत.पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा व स्थानिक वर्तमानपत्रातून डेंग्यू साथ नियंत्रणाअंतर्गत जाहीर आवाहन केले आहे. शहरातील स्थानिक केबल नेटवर्कव्दारे नागरिकांना डेंग्यू साथ प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत आवाहन सुरू आहे. पंढरपूर शहरातील प्रमुख चौकाचा दर्शनी भाग, शाळा व महाविद्यालयांमध्ये आरोग्य व हिवताप विभागामार्फत २० डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. वर्तमानपत्रांमधून ५,००० व कंटेनर सर्वेक्षणावेळी १५,००० असे २०,००० जाहीर आवाहनाचे हॅन्डबिल वाटप करण्यात येत आहेत. डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी हाती घेण्यात आलेली विशेष मोहीम उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्याधिकारी डॉ. संग्राम गायकवाड, हिवताप पर्यवेक्षक डी. एफ. गजाकोश, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, महादेव अदापुरे, बर्मा पवार, कुमार भोपळे हे यशस्वीपणे राबवित आहेत.------------------शहरातील नागरिकांमध्ये जनजागृतीसाथ नियंत्रणासाठी सुमारे ५० कर्मचाºयांद्वारे पंढरपूर शहरातील डेंग्यू साथ नियंत्रणासाठी कंटेनर सर्वेक्षणांतर्गत डासअळी आढळून आलेल्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकणे, प्रत्येक घरामध्ये जाहीर आवाहनाचे हॅन्डबिल वाटप करणे, फॉगिंग मशीनने धूर फवारणी करणे, तात्पुरत्या स्वरुपातील डासोत्पत्ती स्थानांमध्ये व गटारीमध्ये डासअळी प्रतिबंधक औषध फवारणी करणे, डेंग्यू साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.--------------------नागरिकांनीही सहकार्य करावेशहरातील नागरिकांनी साठा केलेले पाणी आठवड्यातून एक दिवस रिकामे करुन कोरडा दिवस पाळावा व आपल्या घरांमध्ये टेरेस-गच्चीवर साठलेले पावसाचे पाणी त्वरित काढून कोरडे करावे. जेणेकरुन डेंग्यूचा डास निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.  डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यातच निर्माण होत असल्याने नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य समिती सभापती भाग्यश्री शिंदे यांनी केले आहे.