शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

‘बसंती, खुले में न जा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:57 IST

कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कुर्डूवाडीतील भिंती बोलायला लागल्या आहेत. ‘बसंती खुले में न जा...’ असा संदेश ...

ठळक मुद्देस्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कुर्डूवाडीतील भिंती बोलायला लागल्या‘बसंती खुले में न जा...’ असा संदेश देणाºया भिंती चितारल्या ‘उघड्यावर शौचास करू नको’ असा सल्ला बसंतीला देणारा गब्बरसिंग शहरवासीयांसाठी चर्चेेचा ठरला

कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कुर्डूवाडीतील भिंती बोलायला लागल्या आहेत. ‘बसंती खुले में न जा...’ असा संदेश देणाºया भिंती चितारल्या आहेत. ‘उघड्यावर शौचास करू नको’ असा सल्ला बसंतीला देणारा गब्बरसिंग शहरवासीयांसाठी चर्चेेचा ठरला आहे.

नगरपालिकेने या बोलक्या भिंती मोक्याच्या ठिकाणी रंगविल्या आहेत. सुमारे ४५ ते ५० भिंतींवर रंगकाम करण्यात आले आहे. भिंतींवरील संदेशात ‘प्लास्टिक कचºयाचा वापर टाळा, पर्यावरण नियम पाळा’, ‘शौचालय का करे प्रयोग, मिटे गंदगी भागे रोग’, ‘हागणदारीमुक्त गाव सारा, शौचास नाही थारा’ अशा विविध संदेशांचा समावेश आहे. या संदेशांकडे लक्ष जावे, यासाठी विविध चित्रेही काढण्यात आली आहेत. 

याचा सकारात्मक परिणाम दिसायला लागला आहे. शहर कचराकुंडीमुक्त झाले आहे. कचरा टाकण्याच्या ठिकाणांवर सकाळी भल्या पहाटे झाडलोट करून सुरेख रांगोळी काढण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी कचरा टाकणेच बंद केले आहे. 

कचरा टाकण्याच्या ठिकाणी बेंचेस बसविण्यात आले आहेत. लालू काका बोळ, नूतन शाळा बोळ, स्मशानभूमी रोड, कब्रस्तान रोड, नेहरुनगर, करमाळा रस्ता, भीमनगर या मार्गावरील हागणदारी दूर झाली असून, परिसर दुर्गंधीमुक्त होत आहे. 

नागरिकांचे होतेय मनपरिवर्तन....च्स्वच्छता समन्वयक मेघा स्वामी, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण व कर्मचाºयांनी एकत्र बसून ही बोधवाक्ये बनविली आहेत. बालोद्यानमधील पाण्याच्या टाकीखाली ‘स्वच्छता अपनाओ, स्वच्छता अपनाओ... अपने घर को सुंदर बनाओ’ या चित्रात लहान निरागस मुले खराटा घेऊन उड्या मारताना दिसत आहेत. बालोद्यानमध्ये आलेली लहान मुले या चित्राकडे आकर्षित होत आहेत. ‘नट नट नटल्या माकडीन बाई, स्वच्छतेचा संबंध नाही’, ‘कचरा टाकून रस्त्यावर, शायनिंग मारते फेसबुकवर’ असे बोचरे संदेशही चित्रांसोबत आहेत. नागरिक मजा म्हणून वाचत असले तरी त्यांचे मत व मन परिवर्तन होऊन स्वच्छतेचे महत्त्व पटायला लागले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत आपले कुर्डूवाडी शहर अधिक सुंदर दिसत आहे. यात कचºयाचे संकलन, विलगीकरण व व्यवस्थापनाचे काम सरू आहे. नागरिकांत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहोत. - समीर मुलाणी, नगराध्यक्ष कुर्डूवाडी नगरपरिषद

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान