शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कायद्याची नियमावलीअभावी बार्शी, सोलापूर बाजार समितीची निवडणूक लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 16:50 IST

सोलापूर दि ३१ :  सहकार खात्याच्या  नव्या कायद्यानुसार निवडणूक घेण्याचा आग्रह असला तरी निवडणुकीसाठीची नियमावली अद्याप तयार नसल्याने निवडणूक कशी घ्यायची ही अडचण आहे

ठळक मुद्देसोलापूर, बार्शीसह राज्यातील संचालक मंडळाची मुदत संपलेलांबणीवर टाकण्यासाठी निवडणूक प्राधिकरण आता उच्च न्यायालयाला विनंती करणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ :  सहकार खात्याच्या  नव्या कायद्यानुसार निवडणूक घेण्याचा आग्रह असला तरी निवडणुकीसाठीची नियमावली अद्याप तयार नसल्याने निवडणूक कशी घ्यायची ही अडचण आहे. सोलापूर, बार्शीसह राज्यातील संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समितीच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी निवडणूक प्राधिकरण आता उच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले.राज्याच्या सहकार खात्याने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक नव्या नियमानुसार घेण्याचा सहकार खात्याचा आग्रह आहे. सहकार खात्याने तयार केलेल्या नव्या कायद्याला मंजुरी मिळाली असली तरी त्यासाठीचे नियम अद्याप तयार झालेले नाहीत. मुदत संपलेल्या प्रशासक व प्रशासकीय मंडळ असलेल्या सोलापूर व बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रशासकाची वर्षभराची मुदत संपण्याअगोदर घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने बार्शी व सोलापूर बाजार समितीबाबत प्रशासकाची मुदत संपण्याअगोदर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर बाजार समिती प्रशासकाची येत्या १७ आॅक्टोबर तर बार्शी बाजार समितीची १२ सप्टेंबर रोजी मुदत संपणार आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी नवीन कायद्यानुसार नियम तयार झालेले नाहीत. उच्च न्यायालयाने १२ जुलै रोजी बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत निर्णय देताना निवडणूक घेण्याची जबाबदारी प्राधिकरणावर सोपविली होती. याबाबत सहकार खात्याच्या निवडणूक प्राधिकरणाला संपर्क साधला असता नवीन कायद्यानुसार निवडणूक घेण्यासाठी अडचण असल्याचे सांगण्यात आले. प्राधिकरण आता नवीन कायद्यानुसार निवडणूक घेण्यासाठी प्रशासकाला मुदतवाढ देण्याची व निवडणूक लांबविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले. ----------------------------------परभणी बाजार समितीबाबतचा निर्णयच्परभणी बाजार समितीच्या प्रशासकाची वर्षाची मुदत संपल्याने जुन्या संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कायद्यानुसार आम्हाला कामकाज करण्याचे अधिकार देण्यासाठीची याचिका दाखल केली होती. औरंगाबादबाबत खंडपीठाने याचिका क्रमांक ७५१३/२०१६ चा निर्णय ९ आॅगस्ट २०१६ रोजी दिला. या निर्णयानुसार प्रशासकाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासनाचा अधिकार नष्ट होतो. न्यायालयाने कायद्यानुसार प्रशासकाला मुदतवाढ न देता जुन्या संचालक मंडळाला अधिकार देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाची प्रत सोलापूर व बार्शी बाजार समितीच्या याचिकेसोबत जोडली होती, असे अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले.