शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
7
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
8
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
9
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
10
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

बस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:57 IST

विविध व्हरायटींची ग्राहकांना भुरळ : कारखानदारांनी केले मार्केटिंग

ठळक मुद्देकारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळली अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले

बार्शी : बार्शी शहरात एकूण २२ दुकाने आहेत. प्रत्येक भांडे दुकानदाराला आपल्या दुकानांमध्ये किमान १०० ते १५० प्रकारची भांडी ठेवावी लागतात़ त्यामध्ये चमच्यापासून पाणी तापविण्याच्या बंबापर्यंतचा समावेश असतो़ सध्याच्या ग्राहकांना व्हरायटी हवी असते, ती येथे पाहायला मिळते़ त्यामुळेच आजही बार्शीत भांडे खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा आहे़ शिवाय बार्शीच्या कारखानदारांनीही त्याचे चांगलेच मार्केटिंग केल्याचे दिसून येते.

राजाभाऊ यवणकर यांच्या दुकान आणि कारखान्याची १२५ वर्षांची परंपरा आहे. पंचाहत्तरी ओलांडलेले राजाभाऊ म्हणाले, ४०-५० वर्षांपूर्वी कच्चामाल हा रेल्वेने रत्नागिरीहून कुर्डूवाडी येथे यायचा आणि तेथून बैलगाडीने बार्शी येथे आणला जायचा़ त्यावेळी लोखंडी घागरी, पाट्या अन् तवे अशा वस्तू बनविल्या जायच्या. मात्र नंतर पितळी घागरी, हांडे बनवायला सुरुवात केली. 

उसाच्या रसापासून गूळ बनविण्यासाठी, हळकुंड उकळून हळद बनविण्यासाठी लागणारी मोठी कढई आम्ही बनवायचो. इंदापूरपासून बीडपर्यंत त्यांना ग्राहकांची मागणी होती. आमच्या कढया इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एका दौºयानिमित्त आल्यानंतर पाहिल्या व असा कारखाना सांगली भागात सुरू करा, असे वडिलांना सांगितले, असेही त्यांनी सांगितले़ बार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मिलिंद पाठक यांचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी बनविण्याचा कारखाना आहे़ या कारखान्यात ताट, डबे, चरवी, कढई या प्रकारची भांडी तयार होतात.

अडचणीमुळे नवी पिढी अन्य व्यवसायाकडे वळलीअलीकडच्या काळात कारखानदारी अडचणीत आली आहे, असे सांगत यवणकरांनी फॅक्टरी अ‍ॅक्ट फार जाचक आहे़ दहापेक्षा अधिक कामगार कारखान्यात ठेवल्यानंतर ईएसआय व पीएफ भरण्यापासून अनेक कायद्यांचे पालन करावे लागते़ कामगारांचे हित पाहिले पाहिजे, पण नियमात शिथिलतेचीही गरज आहे़ कारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळल्याचे राजाभाऊ यवणकर यांनी सांगितले.

म्हणूनच तांब्याच्या भांड्यांच्या मागणीत वाढबार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विभुते यांचा तांब्या-पितळेची भांडी बनविण्याचा खूप जुना कारखाना आहे़ कारखान्याची माहिती सांगताना तिसºया पिढीतील कुमार विभुते यांनी बाजारात नवे ट्रेंड येतात़ अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे़ त्यामुळे या भांड्यांमधून अन्न सेवन करणे व पाणी पिणे याला ग्राहक पसंती देऊ लागले आहेत़ या कारखान्यामध्ये तांब्या-पितळेची घागर व हंडा बनविले जातात़ पूर्वी पुणे व भंडारा येथून कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल येत असे, त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीMarketबाजार