शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारमधील वेटरला रिक्षातून पळवून नेले, सर्वांगास चटके देऊन बेदम मारहाण

By विलास जळकोटकर | Updated: November 25, 2023 15:56 IST

सोलापुरात  धक्कादायक प्रकार, सात जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर: बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या १७ वर्षाच्या वेटरला मुलींची छेड काढते असे कारण देत रिक्षातून पळवून नेले. त्याला पाईपनं आणि सर्वांगास चटके देऊन जखमी केले. शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ओमशांती बियर बारसमोरच्या मैदानात ही घटना घडली. बबलू श्रीनिवास संगा (वय- १७, रा. माळीनगर, एमआयडीसी रोड, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.जखमी बबलूच्या फिर्यादीनुसार गणेश, बबलू, विकास, बसू यांच्यासह दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत बबलू संगा याने म्हटले आहे की, यातील तो माळीनगर येथे आई, लहान भावासमवेत राहतो. एमआयडीसी परिसरातील बिअरबारमध्ये तो वेटर म्हणून कामाला आहे. बारच्या बाजूला विकास याची टपरी आहे तेथे बबलू व गणेश कामाला आहेत. २१ नोव्हेंबर रोजी बारच्या पाठिमागे राहणाऱ्या महिलांनी फिर्यादीला गल्लीतील मुुलींची छेड काढतो म्हणून शिवगाळ केली होती. घाबरुन फिर्यादी मावशीकडे गेला होता.दुसऱ्या दिवशी अरफान नगर येथील मावशीकडे फिर्यादी गेला असता ओळखीचा गणेश व अनोळखी दुचाकीवर आले त्यांनी काम असल्याचे सांगून दुचाकीवर बसवून नेले. बारसमोरील मैदानात आणून कपडे फाडले. फायबरच्या पाईने व लोखंडी सळई तापवून सर्वांगास चटके दिले.या प्रकारानंतर बार मालकाला समजाच त्यांनी फिर्यादीच्या आईला बोलावून घेतल्यावर आईने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास सपोनि कुकडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी