शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे; सोलापुरात पुन्हा एकदा दूध भेसळीचा प्रकार उघड; जाणून घ्या, कुठे टाकली 'एफडीए' ने धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 16:41 IST

गोडेतेल, व्हे परमिट पावडरचा केला जात होता वापर

सोलापूर : येथील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे. 

दरम्यान, ९ एप्रिल रोजी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर यांनी ज्ञानेश्वर दत्तात्रय करळे यांच्या मालकिच्या मे. अक्षय डेअरी (मु. पो. भोंणजे, ता. बार्शी, जि. सोलापूर)  या ठिकाणी अचानक धाड टाकली. या धाडीत  व्हे परमिट, खाद्यतेल वापरुन दुधामध्ये भेसळ केली जात होती. त्यांनतर न. त. मुजावर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी भेसळयुक्त दुध या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित दुध-६४०, लिटर, किंमत रुपये- १९२००/-, सुर्यफुल तेल- २३.४ किलो, किंमत रुपये- ३७७४/- व व्हे परमिट पावडर- ४५६ किलो, किंमत रुपये- ७२९६०/- असे एकूण एकत्रित किंमत रुपये-९५९३४/- चा साठा जप्त करुन ताब्यात घेतला. तसेच सदर भेसळयुक्त दुध हे नाल्यामध्ये ओतून नष्ट केले. 

सदरची कारवाई अभिमन्यु काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई व सह आयुक्त (पुणे विभाग), पुणे शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी नसरिन मुजावर यांच्या पथकाने पूर्ण केली.

टॅग्स :SolapurसोलापूरFDAएफडीएMilk Supplyदूध पुरवठा