शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:38 IST

कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीचजिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रब्बी हंगामात बँकांकडून कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याच कालावधीत मागील वर्षीचे कर्ज भरणे व नव्याने कर्ज घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बीसाठी कर्ज वाटपाला आॅक्टोबरपासून सुरुवात होते. आॅक्टोबरपासून नव्याने कर्ज वाटपाला सुरुवात होत असली तरी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले जाते. यावर्षी कर्जमाफीमुळे कर्ज घेणारे भरण्यासाठी बँकांकडे फिरकत नाहीत व नव्याने कर्जवाटपही केले जात नाही. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत १०१ शेतकºयांना ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटले आहे. ग्रामीण बँकेला ९४ कोटी ३२ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, बँकेने आतापर्यंत २०२ शेतकºयांना दोन कोटी ४५ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच राष्टÑीयीकृत बँकांना रब्बी हंगामासाठी १८१५ कोटी १६                 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ५१६१ शेतकºयांना १०४ कोटी  ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.---------------------बँकांकडून पारखून कर्ज वाटप - २००७-०८ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कर्जमाफीनंतर राज्य शासनाने यावर्षी कर्जमाफी केली आहे. काही ठराविक शेतकरी वगळता बहुतेक शेतकरी दोन्ही वेळच्या कर्जमाफीच्या यादीत आहेत. कर्ज घेतल्यानंतर पुन्हा कर्जमाफीची वाट पाहणारे व बँकांशी नियमित व्यवहार करणारे शेतकरी अशा दोन प्रकारच्या शेतकºयांची यादी बँकांकडे आहे. थकबाकीमुळे बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत आल्याने आता बँका पारखून कर्ज देत आहेत.------------------- दोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीच- सर्व बँकांना रब्बीसाठी २३८९ कोटी ४८ लाख रुपये इतके कर्ज वाटप करावयाचे असून, प्रत्यक्षात १०८ कोटी एक लाख रुपयेच कर्ज वाटले आहे.- मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले होते.- जिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक