शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल ‘डिस्टन्स’ पाळले जात नसल्यानेच बँक कर्मचारी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:45 IST

दुर्लक्षितच ठेवणार का ?: युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनचा सवाल

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा देणाºया इतर विभागातील कर्मचाºयांना पन्नास लाख रुपये विमा कवच दिले जाते बँक कर्मचाºयांचा याबाबतीत विचारही केला गेला नाही, ही बाब दुजाभावाची आहेकिमान स्थानिक राजकीय नेत्यांनी याचा विचार करून बँक कर्मचाºयांना न्याय द्यावा

सोलापूर: आर्थिक व्यवहार करण्यासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत येणारे ग्राहक फिजिकल डिस्टन्सचे भान ठेवत नसल्यामुळे बँक कर्मचाºयांचा जीव धोक्यात आला असून, आजवर २१ कर्मचारी कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. ही स्थिती पाहता बँक कर्मचारी नेहमी दुर्लक्षितच राहणार का? असा सवाल युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनचे जिल्हा समन्वयक सुहास मार्डीकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उपस्थित केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात बँक सेवा अत्यावश्यक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कर्मचाºयांना योग्य ती सुविधा व सुरक्षा देण्याची ग्वाहीही देण्यात आली; पण हे सर्व कागदावरच राहिले. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रेड झोन घोषित करण्यात येत आहेत. तेथील शाखा तात्पुरत्या बंद ठेवल्या; पण तेथेही सेवा दिली जात आहे, ही गंभीर बाब आहे. 

सरकारी योजना राबविण्यासाठी बँकांवर दबाव येत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील बँकाही सुरू कराव्याच लागत आहेत. याचा परिणाम मात्र बँक कर्मचाºयांना भोगावा लागत असून, आजवर राज्यातील साठ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय २१ बँक कर्मचाºयांना जीव गमवावा लागला आहे, हे वेदनादायी असून, याचा मात्र साधा विचारही केला जात नाही, याबाबत फोरमने खंत व्यक्त केली आहे.

ग्राहक बँकेत अनेक कामांसाठी येत असतात. कुणाला पैसे काढायचे असतात किंवा भरायचे असतात. कुणाला कर्ज प्रकरणाची चौकशी करायची असते, तर कोणी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या शाखेत येतो. अशावेळी लोक फिजिकल डिस्टन्सचे भान ठेवत नाहीत. या प्रकारच्या वर्तनामुळे कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण बँक सील करून सर्व कर्मचाºयांना क्वारंटाईन केले जाते आणि शासन यासाठी बँकेलाच जबाबदार धरते, ही दुर्दैवाची बाब आहे, असे मार्डीकर यांनी नमूद केले आहे.

मुंबईमध्ये लोकल ट्रेनची सेवा सुरू झाली. मात्र, त्यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांनाच प्रवास करता येतो, असा आदेश शासनातर्फे काढण्यात आला. यावेळी मात्र अत्यावश्यक सेवेत बँक कर्मचारी येत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

विम्याचे कवच नाही - अत्यावश्यक सेवा देणाºया इतर विभागातील कर्मचाºयांना पन्नास लाख रुपये विमा कवच दिले जाते; पण बँक कर्मचाºयांचा याबाबतीत विचारही केला गेला नाही. ही बाब दुजाभावाची आहे. आमचे कर्मचारीही जीव धोक्यात घालून ग्राहकांना सेवा देत असतात, पण सरकारला आमच्याविषयी अजिबात सहानुभूती दिसत नाही. किमान स्थानिक राजकीय नेत्यांनी याचा विचार करून बँक कर्मचाºयांना न्याय द्यावा, इतकीच माफक अपेक्षा आहे, असे सुहास मार्डीकर यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या