शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतच पैसं न्हायतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:11 IST

गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा ...

गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा कमावलेला. घाम गाळून पै-पै गठुड्यात साठवलेलं. लेकरू-बाळ नाही म्हटल्यावर, पुतण्यावरच जीव लावला. कुणीतरी वेळेला पडेल म्हणून तिने तो आधार शोधला होता.

पुतण्याही तिचा आधार झाला होता. त्याच्यावर खूप जीव आणि तितकाच विश्वासही. घासातला घास काढून ठेवावा. पैशातला पैसा त्याच्यासाठी द्यावा. गठुड्यात साठलेलं पैसं काय करायचं म्हणून, या पुतण्याच्याच ओळखीनं बँकेत ठेवलेलं. डीसीसी बँकेत निराधारचे सहाशे रुपये, कधी पाचशे रुपये मिळायचे. ते पण साठवून ठेवलेले. हिश्श्याची ज्वारी मिळायची. ती विकायची. त्यातून साठलेले पैसेही असायचे. एकट्या जीवाला लागतंय किती आणि एक माणूस खातो किती?

पुतण्यावर जीव. पुतण्याचा त्याच्या मित्रावर विश्वास. मित्र पतसंस्थेचा संचालक. केली एफडी त्याच्या पतसंस्थेत. महिने गेले. वर्षे गेली. पैशाचे दामदुप्पट व्हायचे. ते पुन्हा फिरवून तिथेच एफडी करायचे. जीव जाळायचा. मोह टाळायचा. मिळालेला कमी-अधिक पैसा त्यात घालून पुन्हा एफडी. त्याला हातच लावायचा नाही.

हात लावायची गरजही नव्हती. बघता बघता ही रक्कम दीड लाख रुपये झाली होती. पतसंस्थेत आपले दीड लाख रुपये आहेत, एवढ्या गोष्टीनं गयाबाईचा जीव सुखावून जायचा. साठवलेला पैसाच उपयोगी येतो. आपल्या आयुष्याची शिदोरी आपण जमा करून ठेवलीय. काय अडचण आली, काही दुखलं-खुपलं तर तेवढाच एक आधार. ऐनवेळेला कोण दारात उभं राहू देतंय. त्या एफडीचं गयाबाईला खूप सुख वाटायचं. खूप आधार वाटायचा. वय वाढत होतं. म्हातारपण वाकडं दाखवत होतं. पण वाकेल ती म्हातारी कसली. 

पैशाला अजिबात हात लावायचा नाही. आपलाच हाय त्यो पैसा, असं म्हणायची. एकदा दुपारची दारात आली. दादा, ये दादा. मला जरा गाडीवर बँकेत घेऊन चल की. मी विचार केला, हिला आता गाडीवर बाजारात कशाला जायचंय? म्हातारी चालत कुठंही जाती. आता हिला एवढं काय तातडीचं काम पडलं? म्हणून विचारलं, कशाला जायचंय बाजारात? कायम जाती तशी जा की चालत.आवाज वाढवूनच म्हटली, आरं, गुडगं गेलं की मातीत. तुला माहीत न्हाय होय. महिनाभर उंबºयाच्या बाहीर पाऊल ठिवायला ईना. तिथल्या तिथं कसंतरी बस-ऊठ करती. मग आता बाजारात कशाला जायचंय? मी विचारलं.

कापºया आवाजात गयावया करतच गयाबाई म्हणाली, आरं, दोन दिवस झालं, परभ्या दवाखान्यात अ‍ॅडमिट हाय.मी म्हणालो, का? काय झालं त्याला? आरं, गाडीला धडकून पडला. कंबरडं मोडलंय. नीट करायचाय. पैसा न्हाई. बँकेत पैसे हायतं. चार दिवस झालं निरोप दितीया बँकेत. कोणच खाईना बघ. आज जावू याच बघ. चल, मला गाडीवर सोडून ई.मी म्हटलं, आगं, तुझा गुडघा बाद झालाय. तुला नीट उभं राहता येत नाही. त्यात तू गाडीवर बसणार. घसरली, पडली तर काय करायचं. कामात काम वाढणार. तुला गाडीवर नीट बसायला पण यायचं नाही. दुसरी गोष्ट तू अशी दुपारची माझ्या कामाच्या वेळी आलीस. मला काम सोडून जायचं म्हणजे अवघड वाटतंय. असं करतो, रिक्षा सांगतो. त्यात बसून तू बँकेत जा. 

आरं रिक्षाला पैसं कुठूनं आणायचं. कोण आणायचं रिक्षा. चल, माज्यासाठी. लय नड हाय. दवाखान्यात पैसं पाठवायचं हायतं. माझा लय जीव हाय रं त्याच्यावर. त्ये लेकरू नीट झालं तर बरं. त्याच्यासाठी नगं का पैसं द्यायला. इलाजासाठी पैसं कमी पडत्यात म्हणत होती त्याची बायको. त्याचा जीव चाललाय. त्याच्यासाठी माझा जीव चाललाय. बँकेत पैसं ठिवून काय काडी लावायची हाय? चल बाबा लवकर!

विचार केला. म्हटलं गाडीवर न्यायचं तर अवघडच आहे. ही म्हातारी नीट बसणार नाही हे नक्की. रिक्षानेच पाठवायला हवं. पाठवायला तर हवंच हवं. विचार केला. गेले साठ-सत्तर रुपये तर काय हरकत आहे. - इंद्रजित घुले(लेखक हे कवी आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूर