शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

५७ तास ३५ मिनिटांसाठी जन्मले होते ते बाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:31 IST

सोलापूरात दोन तोंड असलेल्या बाळांचा जन्म, माता-पित्यांची बांधिलकी, वैद्यकीय अभ्यासासाठी केले बाळाचे देहदान

ठळक मुद्देलाखात एखादं जुळं बाळ जन्मण्याची घटना सोलापूरातसामाजिक कार्यात पुढाकार घेणारे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पुढाकार घेतलाअभ्यासाच्या दृष्टीने देहदानाचा प्रस्ताव

विलास जळकोटकर सोलापूर : लाखात एखादं जुळं बाळ जन्मण्याची घटना सोलापूरच्या शासकीय रुगणालयामध्ये गुरुवारी घडली. अशा दुर्मिळ बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, मात्र त्याच्या आयुष्याची दोरी अल्पायुषी असावी. गुरुवारी १० वाजून १५ मिनिटांनी जन्मलेलं हे बाळ आज शनिवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू पावलं. म्हणजे ५७ तास ३५ मिनिटे हे बाळ जगलं. या बाळाच्या आई-वडिलांना यापूर्वीच धक्का बसलेला. आज त्याच्या जाण्यानं दुसरा धक्का बसला, पण अशा स्थितीतही या माता-पित्यांनी डॉक्टर आणि स्नेहीजनांच्या समुपदेशाने काळजावर दगड ठेवून देहदान केले. आपल्या बाळाच्या देहाचा उपयोग नव्या पिढीच्या डॉक्टरांना संशोधनासाठी व्हावा, हा त्यामागचा हेतू. पालकांच्या या औदार्याबद्दल रुग्णालयातील प्रशासनानं विशाल दृष्टिकोनाबद्दल आभार मानले.

गोदुताई विडी घरकूल क परिसरात राहणारे मोबीन अब्दुल शेख आणि रजिया शेख हे सामान्य स्थितीत आपली उपजीविका करणारं कुटुंब. गुरुवारी शासकीय रुग्णालयात रजिया यांच्या पोटी दोन डोकी, एक धड असलेलं हे बाळ जन्मलं. या कुटुंबीयांच्या दृष्टीनं हा धक्काच होता. डॉक्टरांनी त्यांना दिलासा दिला. रुग्णालयामध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू केले. यासाठी २४ डॉक्टरांचे पथकही तैनात होते.

बाळाची स्थिती चिंताजनक असली तरी त्यांच्यावर विशेष दक्षता घेण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिलेल्या होत्या. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शाकिरा सावस्कर, सहयोगी प्रा. डॉ. सुदर्शन चक्रे आदी मंडळी देखरेख करीत होती. पण अथक प्रयत्नांनंतरही हे बाळ वाचू शकलं नाही. अडीच दिवसांनंतर म्हणजे गुरुवारी १० वाजून १५ मिनिटांनी जन्मलेल्या या बाळानं शनिवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. 

सारेच नि:शब्द झाले. यात सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून डॉक्टरांनी त्या बाळाचे आई-वडील, आजोबा अनीश खरादी यांच्याशी संवाद साधला. जन्मलेल्या बाळाचा दफनविधी करण्याऐवजी नव्या पिढीच्या डॉक्टरांना संशोधनाच्या, अभ्यासाच्या दृष्टीने देहदानाचा प्रस्ताव ठेवला.

गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित घटनांनी गोंधळून गेलेल्या बाळाच्या आई-वडिलांचे सांत्वन करून बाबा मिस्त्री यांनी समजावून सांगितल्याने ते तयार झाले. पोटचं पोर कसंही असो त्याच्याबद्दल आई-वडिलांना आत्मीयता असतेच. पण त्यांनी काळजावर दगड ठेवून देहदानास होकार दर्शविला, ही सामाजिक परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल.

माता-पित्यांचे योगदान मोलाचे- मृत्यू पावलेलं हे बाळ पालकांनी सारे सोपस्कार पूर्ण करून शरीररचना विभागाकडे सुपूर्द केले. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरणार आहे. बाळाच्या आई-वडिलांनी याचे दफन न करता उदात्त हेतू ठेवून आपल्या पोटच्या गोळ्याचे देहदान करण्याचे हे योगदान मोलाचे असल्याच्या प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी व्यक्त केल्या.

माणुसकी अन् लाखमोलाची श्रीमंती- फॅब्रिकेशनचे काम करणाºया मोबीन शेख आणि घरकाम करणाºया रजिया शेख या जोडप्याने पोटचा गोळा देहदान करून आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत पैशापेक्षाही लाखमोलाची श्रीमंती दाखवली आहे. अल्पशिक्षित असूनही त्यांनी दाखवलेला हा औदार्यपणा समाजापुढे आदर्श ठरला असल्याच्या भावना वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केल्या.

संशोधन अन् अभ्यासासाठी उपयुक्त: गांधी- ज्या सयामी (जुळे) बाळाचा शासकीय रुग्णालयामध्ये जन्म झाला, त्या मातेची सोनोग्राफी तपासणी आपल्याकडे झालेली होती. दुर्दैवाने ते जगू शकले नाही. पण त्या बाळाच्या आई-वडिलांनी त्याचे देहादान करून दाखवलेला मोठेपणा निश्चितच मोलाचा आहे. नव्याने वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना तो अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा प्रख्यात स्त्रीरोय व प्रसतुशास्त्र तज्ज्ञ डॉ. अजित गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटल