शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील बाललीलेतील गणरायाचे भक्तांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:17 IST

सोलापुरी गणपती; नगर, पेण, अमरापूर येथील गणेशमूर्ती; बालगोपाळांसाठी भक्तांची खास मागणी

ठळक मुद्देसोलापुरातील काही मूर्तिकारांनी या मूर्तींवर बारीक टिकल्या, कुंदन, मोती, सोनेरी पट्टे, चमकी आदींनी सजावट केलीसाधारणत: एक ते दोन फूट उंचीच्या या आकर्षक रेखीव मूर्ती असून, साधारणत: अकराशे ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आपल्या विविध बाललीलातून सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया गणेशमूर्ती पूजनासाठी घरी आणण्याकडे सोलापूरकरांचा कल

यशवंत सादूल 

सोलापूर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे. राज्यात आलेल्या पुराच्या संकटातून सावरण्यासोबत येणाºया संकटावर मात करण्याची शक्ती मिळावी. या हेतूने साध्या स्वरूपात का होईना उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे तयारीत आहेत. संकटमोचक लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्व कुटुंबीय आतुर आहेत. आपल्या विविध बाललीलातून सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया गणेशमूर्ती पूजनासाठी घरी आणण्याकडे सोलापूरकरांचा कल दिसून येत आहे. शहरातील विविध स्टॉल्सवर अशा बाललीलेतील गणपतीची आगाऊ नोंदणी झाली आहे. 

पूर्व भागातील व्हिवको प्रोसेस येथील दुर्गा आर्टस, टिळक चौक येथील वसंत कॅप, भडंगे विठ्ठल मंदिर येथील सुपेकर बंधू यांच्यासह शहरातील अनेक स्टॉल्सवर अशा गणेशमूर्ती विक्रीसाठी आहेत. विक्रीसाठी असलेल्या तीन ते साडेतीन हजार गणेशमूर्तींपैकी पंचवीस ते तीस टक्के बालगणेश मूर्ती आहेत़ दिवसेंदिवस या मूर्तीची क्रे झ वाढत आहे व मागणीतही वाढ होत आहे, असे मूर्तिकार व विक्रेते विठ्ठल मुनगा-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यातील बहुतेक मूर्ती या पेण, नगर, अमरापूर येथून मागविण्यात आल्या आहेत. साधारणत: एक ते दोन फूट उंचीच्या या आकर्षक रेखीव मूर्ती असून, साधारणत: अकराशे ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत.

सोलापुरातील काही मूर्तिकारांनी या मूर्तींवर बारीक टिकल्या, कुंदन, मोती, सोनेरी पट्टे, चमकी आदींनी सजावट केली आहे. त्याचा वेगळाच प्रभाव पडतो आहे.

मूर्तीकडे पाहताक्षणीच प्रेमात..- आपल्या घरातील लहान मुलाच्या विविध लीला पाहण्यात, त्याच्या सुरस कथा कौतुकानं सांगण्यात सर्वांनाच आनंद होत असतो. याच लीला गणरायाच्या रूपात बालगोपालांसह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. गादीवर पहुडलेला, नंदीवर आरूढ, डमरू वाजविणारा, वासराला माया करणारा, कासवावर, सिंहावर आरूढ अशा अनेक बालरूपात गणराय साकारले आहेत. घरातील लहान मुले या मूर्तीकडे पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडतात अन् या मूर्तीसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरत आहेत. त्यांच्यासाठी ही आनंद पर्वणीच. 

टॅग्स :SolapurसोलापूरGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सवMarketबाजार