सोलापूर : नकाशाची प्रत देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना नगर भूमापन कार्यालयातील शिपाई रमेश चंद्रकांत रेवजे याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने नगर भूमापन कार्यालयात नकाशाची प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता. शिपाई रेवजे याने प्रत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितली. शेवटी तडजोडीने २०० रुपये द्यायचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला. खात्याने सापळा लावून रेवजे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. रमेश रेवजे याच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लाच घेताना शिपाई अटकेत
By admin | Updated: September 3, 2014 00:55 IST