कुर्डूवाडी येथील व्यापारी शुभंकर सुरेंद्र पाठक (२६, रा. जैन मंदिराजवळ) हे तानाजी सलगर या कामगाराबरोबर एमएच -४५ यू-७४८९ या दुचाकीवरून दुकानातील सोने- चांदी असलेल्या बॅगा घेऊन जैन मंदिराजवळ असणाऱ्या घराकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून अचानकपणे अज्ञात तीन चोरट्यांनी येऊन त्यांना हाक मारत पाठीमागे बसलेल्या कामगाराच्या डोळ्यात चटणी टाकली. जवळ असणाऱ्या पिस्तूलचा धाक दाखवत सोन्या-चांदीच्या बॅगा लुटण्याचा प्रयत्न केला. पण घराकडे पाहत व्यापाऱ्याने आरडाओरड सुरू केला. त्यामुळे ते अज्ञात चोरटे विठ्ठल मंदिराच्या दिशेने पळून गेले. यामुळे अज्ञात चोरट्यांच्या तावडीतून सुटका करून घेत आपल्याजवळच असणाऱ्या घरात सोन्या चांदीच्या सर्व बॅगासह धाव घेतली. सुटकेचा नि:श्वास टाकला. या घटनेबाबत व्यापारी शुभंकर पाठक हे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही. पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरूच होती.
चाकूचा धाक दाखवून सराफ व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न असफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST