शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिलीव घाटात एसटी दरोड्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:23 IST

माळशिरस : साताराहून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसवर दरोडेखोरांनी दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस ...

माळशिरस : साताराहून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसवर दरोडेखोरांनी दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस जोरात खाली आणली. या हल्ल्यात चालक जखमी झाला आहे. तसेच पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून त्याच्यावर दगडाने हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सातारा स्थानकातून सोलापूरच्या दिशेने निघालेली एस.टी. बस (एम. एच. १३ एस. ८९७१) म्हसवडजवळ आली. येथे चालक आणि वाहकाने जेवण आटोपून बस पुढे आणली. घाटातून बस शेवटच्या वळणावर आली. अचानक झाडामागे लपलेले चार-पाच तरुण पुढे येत चालकाच्या दिशेने दगडफेक करून बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाने बस न थांबवता पुढे जोरात दामटली. घाटाखाली उतरताच वर निघालेल्या लोकांना थांबवून याची माहिती दिली. तसेच तत्काळ माळशिरस पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घाटाकडे घेतली. रस्ता रात्रीत पूर्ववत केला आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.

----

दुचाकीस्वाराला मारहाण

या बसच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारालाही या चोरट्यांनी थांबवून मारहाण केल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी सांगितली. या हल्ल्यात तोही जखमी झाल्याचे वृत्त असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.