शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:34 IST

सोलापूर :  महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ओबीसी आयोगाकडे प्रयत्न करण्यात येईल तसेच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे दिले.होटगी मठाच्या वतीने येथील वीरतपसवी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १००८ शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ...

ठळक मुद्देवीरतपसवी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १००८ शिवलिंगाची प्रतिष्ठापनाबसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा दिली

सोलापूर :  महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ओबीसी आयोगाकडे प्रयत्न करण्यात येईल तसेच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे दिले.

होटगी मठाच्या वतीने येथील वीरतपसवी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १००८ शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी व काशी, श्रीशैल, उज्जैन पीठाचे जगदगुरू उपस्थित होते. 

पालकमंत्री देशमुख यांच्या मागणीवरून फडणवीस म्हणाले की, राज्यातील हिंदु लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचण दूर करण्यासाठी याबाबतचा विषय ओबीसी आयोगाकडे पाठविण्यात येईल. लिंगायत समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा दिलीच आहे. या स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. याचवेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषणे झाली़

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चा