शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्हाप्रमुखांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण..

By appasaheb.patil | Updated: July 2, 2023 14:06 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा हब्बू यांचे पती खेडपाटी बार्शी येथील टोलनाक्याच्या बाजूस पानपट्टी चालवतात. त्या मोकळ्या प्लॉटच्या पाठीमागे गणेश वानकर यांचे मोकळे प्लॉट आहे. 

सोलापूर : महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश प्रकाश वानकर (रा. इंद्रधनु अपार्टमेंट, मरीआई चौक, सोलापूर) यांच्यासह सहा जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत साेलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उषा मलिक हब्बू (वय ५५, रा. विश्वविहार सोसायटी, खेड, उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा हब्बू यांचे पती खेडपाटी बार्शी येथील टोलनाक्याच्या बाजूस पानपट्टी चालवतात. त्या मोकळ्या प्लॉटच्या पाठीमागे गणेश वानकर यांचे मोकळे प्लॉट आहे. फिर्यादीस गणेश वानकर यांनी तुझी जागा ही बेकायदेशीर आहे, असे म्हणत त्यांना तुच्छतेने बोलत होते. याप्रकरणी त्यांनी कोर्टात खासगी फिर्याद दिली होती. याचा राग मनात धरून १ जुलै रोजी दुपारी फिर्यादी व त्यांच्या घरातील सगळी मंडळी घरात असताना आरोपी गणेश वानकर व त्यांच्यासोबत चार ते पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.

तसेच फिर्यादीच्या सुनेचा हात पिरगाळला. शिवाय माझे खडी क्रशरच्या गाड्या आहेत, त्याच्या खाली घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून गणेश वानकर व त्यांच्या पाच साथीदारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

खोट्या ॲट्रॉसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार : वानकरबार्शी टोल नाक्याजवळील भोगाव हद्दीत अवैध दारू व्यवसायाला विरोध केल्यामुळेच आपल्यावर नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशा खोट्या केसेसला आपण कदापि जुमानणार  नाही. याउलट लोकहिताची कामे करत असताना धमक्यांना आपण घाबरणार नाही, असे सांगत खोट्या ॲट्रॉसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूर