शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदारांच्या मालमत्ता बँकांच्या ताब्यात देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:43 IST

कर्जबुडव्यांवर होणार कारवाई,  निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून प्रस्ताव पारित

ठळक मुद्देबँकांचे कर्ज बुडवून गब्बर झालेल्यांची संख्या जिल्ह्यातही वाढली कर्ज थकबाकी होत असताना बँकांकडून नोटिसा दिल्या जातातसरफेसी कायद्यान्वये मालमत्ता जप्तीसाठी बँका जिल्हा प्रशासनाकडे धाव

सोलापूर : हेतुपुरस्सर कर्ज बुडविणाºया जिल्ह्यातील आणखी २० थकबाकीदारांच्या १० कोटींच्या मालमत्ता सरफेसी कायद्यान्वये बँकांच्या ताब्यात देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तहसीलदारांना दिले आहेत. यामध्ये सोलापूर शहर, माढा, बार्शी, दक्षिण सोलापूर आणि माळशिरस तालुक्यातील थकबाकीदारांचा समावेश आहे. 

बँकांचे कर्ज बुडवून गब्बर झालेल्यांची संख्या जिल्ह्यातही वाढली आहे. कर्ज थकबाकी होत असताना बँकांकडून नोटिसा दिल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर सरफेसी कायद्यान्वये मालमत्ता जप्तीसाठी बँका जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतात. सरफेसी कायद्यान्वये मालमत्ता जप्तीचे प्रस्ताव पूर्वी जिल्हाधिकाºयांकडून पारित केले जात होते.

आता हे अधिकार निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत जुलै २०१५ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत २५० कोटींच्या थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले होते. यानंतर दाखल झालेले प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तत्काळ मार्गी लावले आहेत. सर्वात मोठे थकबाकीदार माळशिरस तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील उद्योजकाने डोंबीवली नागरी सहकारी बँकेकडील ५ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्याची मालमत्ता बँकेच्या ताब्यात देण्यात आली आहे.

सर्वात लहान थकबाकीदार आयडीबीआय बँकेकडील आहेत. आयडीबीआयने ४ लाख ६१ हजार ८५८ रुपयांच्या थकबाकीप्रकरणी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील तहसीलदारांकडून मालमत्ता जप्त करून बँकांच्या ताब्यात दिली जाणार आहे. 

ताबा देणारे कार्यालय आणि बँकेकडील थकबाकी- उत्तर सोलापूर तहसील कार्यालय : समर्थ बँक (८१ लाख ९३ हजार ४७८), समर्थ बँक (१७ लाख ९८९), समर्थ बँक (३५ लाख ८६ हजार ५२७), आयडीबीआय बँक (४ लाख ६१ हजार ८५८), आयडीबीआय (८ लाख २३ हजार ७८४), इंडियन ओव्हरसीज बँक (३१ लाख १० हजार १०२), स्टेट बँक आॅफ इंडिया (५ लाख १० हजार ५७२), समर्थ बँक (८१ लाख ९३ हजार ४७८), सोशल बँक (१५ लाख ४८ हजार ७२३), बँक आॅफ महाराष्ट्र (१७ लाख ३१ हजार ७८९), स्टेट बँक आॅफ इंडिया (९ लाख ३ हजार ५५७), आयडीबीबाय (१६ लाख ५१ हजार १६३), स्टेट बँक आॅफ इंडिया (५ लाख १९ हजार ५११), आयडीबीआय (११ लाख ३ हजार ४७०) माढा : आयडीबीआय (१ कोटी ६ लाख १७ हजार १४३), जनता सहकारी बँक (६ लाख ६६ हजार ४२१), बार्शी : बँक आॅफ महाराष्ट्र (३४ लाख ९७ हजार २१०), दक्षिण सोलापूर : स्टेट बँक आॅफ इंडिया (९ लाख ९५ हजार ९१०), स्टेट बँक आॅफ इंडिया (१७ लाख २६ हजार २८०), माळशिरस : डोंबीवली नागरी सहकारी बँक (५ कोटी १३ लाख ८३ हजार ७१७). 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र