शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीत फिरते रुग्णालय, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा उपक्रम

By admin | Updated: June 23, 2017 14:16 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : आषाढी वारीमध्ये धर्मादाय आयुक्त विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी फिरत्या रुग्णालयाची सोय केल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.बदलत्या काळानुसार धर्मादाय कार्यालयाने आॅनलाईन प्रणाली अवलंबली आहे. या उपक्रमांतर्गत संस्था नोंदणी, न्यास नोंदणी, न्यासाची हिशोबपत्रके ही कामे आॅनलाईन करणे शक्य झाले आहे. याची माहिती व्हावी यासाठी २४ जून २०१७ रोजी विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे ‘विश्वस्तांची कार्यशाळा आणि संगणकीकृत प्रशासनाची ओळख’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती पी. डी. नाईक उपस्थित राहणार आहेत. धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे हे विश्वस्तांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय पुणे विभागाचे धर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांचीही उपस्थिती असणार आहे. या उपक्रमाशिवाय आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या सर्व भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सोलापूरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने वैद्यकीय सेवा शिबीर आणि फिरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली आहे. हे शिबीर २७ जून ते ७ जुलै २०१७ या कालावधीत सुरू राहणार आहे. दोन्ही उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेस सहा. धर्मादाय आयुक्त माधव बोराळे, अमोलकुमार देशपांडे, रूपाली कोरे, निरीक्षक एम. व्ही. जावळे, एस. एस. कुमठेकर, आदेशिक वाहक बी. व्ही. दांडगे यांची उपस्थिती होती.