शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
3
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
4
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी
5
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
6
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
7
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
8
अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल
9
पालकांनो, मुलांना सांगताय... पण तुम्ही स्वतः काय करता आहात? कुटुंबासाठी मोबाईल असा ठरतोय घातक
10
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
11
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
12
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
13
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
14
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
15
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
16
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
17
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
18
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
19
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
20
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

पंढरपुरात विठू नामाचा गजर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आषाढीची शासकीय महापूजा 

By appasaheb.patil | Updated: June 29, 2023 03:13 IST

Ashadhi Ekadashi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात संपन्न झाली.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या  भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.

या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

विशेष म्हणजे आज प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या मानाचे वारकरी दांपत्याच्या हस्ते परंपरेनुसार पूजा करण्यात आली. दरम्यान महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारी ही दुसरी शासकीय महापूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

हे आहेत मानाचे वारकरी...अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांना विठ्ठल-रूक्मिणीच्या महापुजेचा मान मिळाला आहे. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे, यासाठी ते सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहिले होते. गेल्या तीस वर्षांपासून कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता त्यांनी जोडीने वारी केली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरEknath Shindeएकनाथ शिंदे