शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात तब्बल अडीच हजार वाहनांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन, ४४ लाखांचा दंड वसूल होणार, सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची कारवाई

By appasaheb.patil | Updated: February 6, 2023 10:53 IST

Traffic Police: महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे.

- आप्पासाहेब पाटीलसाेलापूर  - महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यातील ३१ दिवसांत २ हजार १७१ वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रस्ते अपघातास अनेक घटक कारणीभूत आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा असमतोलपणा, कुठे दुभाजकांमध्ये अधिक वाढलेली झाडे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सन २०२१ मध्ये रस्ते अपघातातील मृतांची संख्या ६१६ असून, २०२२ मध्ये ही संख्या ७०२ पर्यंत वाढली आहे. याचा परिणाम मृत व्यक्तीच्या कुटुंबावरही होतो. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करून वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा वेग मर्यादितच ठेवावा. लवकर निघा अन् सुरक्षित स्थळी लवकर पोहोचा, असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने केले आहे.

एका महिन्यात ४३ लाखांचा दंडजानेवारी महिन्यात पुणे, तुळजापूर, हैदराबाद, मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर व अन्य राष्ट्रीय महामार्गावर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणाऱ्या २ हजार १७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहेत. या वाहनांना ४३ लाख ३९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

सोलापुरातून जाणारे सर्वच रस्ते चांगले झाल्याने वाहनधारक वेगात वाहने चालवीत आहेत. दररोज शेकडो गाड्या वेगमर्यादेचे पालन करीत नसल्याने स्पीड गनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांनी वेग पाळावा, अपघात टाळावा, वाहतूक नियमांचे पालन करावे.

- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSolapurसोलापूर