शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 15:26 IST

कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये कोणती ना कोणती कला असतेच. ती कला ओळखता आली पाहिजे. ...

ठळक मुद्देलोकशाहीमध्ये संगीताची कदर असणारी मंडळी कमीज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचे कलावंतांकडे लक्ष असणे आवश्यक  शास्त्रीय संगीत जगातल्या प्रत्येक माणसाला अत्यावश्यक

कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये कोणती ना कोणती कला असतेच. ती कला ओळखता आली पाहिजे. यासाठी आई-वडिलांचा आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जो स्वत:ला ओळखत नाही. कला विकसित करत नाही. त्याच्यातील कला विकसित होतात.

एक काळ असा होता कलाकारांना राजाश्रय मिळायचा. त्यांना संगीताची साधना करण्याशिवाय इतर दुसरं कोणतंच काम नसायचं. संसाराची कसलीच चिंता त्यांना नसायची. संसारात असणाºया आवश्यक सर्व गोष्टी राजाकडून पूर्ण केल्या जायच्या. त्यामुळे संगीताची उत्तम साधना त्यांच्याकडून होत असे. संगीत साधनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची संधी त्यांना मिळत असे. संगीताचा सर्वोच्च आनंद स्वत: घेत असत. राजाला देत असत.त्याबरोबरच जनतेलाही आनंद मिळवून द्यायला ते समर्थ असत. 

आजच्या कलावंतांची स्थिती वेगळी आहे. लोकशाहीमध्ये संगीताची कदर असणारी मंडळी कमी आहेत. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचे कलावंतांकडे लक्ष असणे आवश्यक आहे.  शास्त्रीय संगीत जगातल्या प्रत्येक माणसाला अत्यावश्यक आहे. हे संगीत मनाची शक्ती वाढवण्याचे काम करते. शरीराची व्याधी नष्ट करते. मनाचा गोंधळ कमी करते. मनाची वाटचाल योग्य दिशेने घडवते. लहान मुलांची निरागसता संगीत क्षेत्रातल्या कलाकारांमध्ये पाहायला मिळते.

जगामध्ये घडणाºया वाईट गोष्टींमध्ये कलावंत आपल्याला दिसणार नाहीत. मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम ते करीत असतात. ज्याच्या आयुष्यामध्ये संगीत नाही त्याचे आयुष्य निरस आहे. मनुष्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत संगीताशिवाय आनंदाने जगू शकत नाही. बालकाच्या जन्माच्या आनंदापासून  त्याच्या मृत्यूच्या दु:खापर्यंत संगीत असतेच. प्रत्येकाच्या मंगलप्रसंगी, दु:खद प्रसंगी संगीत असतेच. संगीत मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ताल असतो, लय असते. ती लय कमी किंवा जास्त झाली की शरीराची अवस्था बिघडते. ती लय योग्य दिशेने असेल तरच जीवन सुरळीत असते. 

त्यामुळे हिंदुस्थानी संगीताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  विशेषत: भारतीय शास्त्रीय संगीताची शक्ती पाश्चात्य देशांनी ओळखली आहे. ते भारतातील सर्व नामवंत, प्रतिष्ठित कलावंतांना आपल्या देशामध्ये बोलावतात. भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार जगातल्या सर्व देशांमध्ये सुरू आहे. भारतीय संगीताचा आनंद ते घेत आहेत. भारतीय कलावंतांना ते मान आणि धन देत असतात. मनाची शांती मिळवत असतात.

आपल्या देशात परिस्थिती नेमकी वेगळी आहे. शास्त्रीय संगीताला राजाश्रय आणि लोकाश्रय कमी होत चाललेला आहे. या कलावंतांची साधना कितीही असली तरी याचा आनंद घ्यायला आपण तयार नाही. त्यामुळे कलाकारांचे व्यक्तिगत जीवन दयनीय असल्याचे जवळून पाहिले आहे. भारतीय कलावंतांना मुखाने दाद दिली जाते. टाळ्या वाजवल्या जातात; मात्र त्याचं पोट भरतं का याचा विचार आपण करायला तयार नाही. अनेक नामवंत कलावंतांचा शेवटचा काळ अतिशय दयनीय अवस्थेत गेलेला आहे. भारतामध्ये एक नामवंत कलावंत होऊन गेले. त्यांची कला ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमत असत. त्यांना वृद्धापकाळ आल्यानंतर ती कला सादर करू शकत नव्हते. त्यावेळी मात्र समाजाने त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष केले.

अन्नान्नदशा होऊन ते स्वर्गवासी झाले. त्यांचा हा शेवटचा काळ लोकांनी पाहिला नाही.अनुभवला नाही. ते गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकत्रित येऊन त्यांच्याविषयी काही चांगले काम करायचे ठरवले.  त्यासाठी खूप मोठा निधी जमा झाला. आपल्याकडे माणूस गेल्यानंतर त्याचे महत्त्व कळते. त्यानंतर आपण जागे होतो.ते जिवंत असताना त्यांच्या वृद्धापकाळी ते कला सादर करत नसताना त्यांची काय अवस्था असते याकडे आपले लक्ष नाही.

आज अनेक मान्यवर, बुजुर्ग कलावंत कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपडतात. कार्यक्रम मिळाला तरी त्यांना योग्य मानधन मिळेलच असे नाही. यासाठी अशा मान्यवर कलावंतांना शासनाने योग्य मानधन योजना सुरू करण्याची गरज आहे. आज खेदाने सांगावेसे वाटते. संगीतामध्ये पद्मविभूषण पदवी असलेले कलाकार आहेत. त्या कलाकाराचा नातू आज एका कंपनीमध्ये कामाला जातो. तो चांगला कलावंत आहे. केवळ या कलेने पोट भरणार नाही म्हणून तो कंपनीत कामाला जातो. असे अनेक कलावंत आहेत. त्यांच्यासाठी राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. तरच भारतीय संगीत हे टिकणार आहे,त्याचा आनंद आपणा सर्वांना घ्यायला मिळणार आहे. संगीतामध्ये प्रचंड शक्ती आहे. ही शक्ती आपण सर्वांनी अनुभवावी.  हीच अपेक्षा. धन्यवाद.                                                      - डॉ. अनिल काशिनाथ सर्जे(लेखक हे संगीत क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरmusicसंगीत