शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सयाजीराजे पार्क येथे कंपन पक्षांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:18 IST

यावेळी डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, कस्तूरिका कुलातील‌ या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात ...

यावेळी डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, कस्तूरिका कुलातील‌ या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीपासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर करून येतात. हे पक्षी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी येऊन राहतात. जोडीने आलेले हे चिमुकले पक्षी उन्हाळा संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहून पावसाळ्याच्या प्रारंभी मूळ ठिकाणी परत जातात.

या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे नर व मादी दोन्ही मधील शेपटी एखाद्या मद्यपी किंवा क्रोधीत व्यक्तीचे हात जसे थरथरतात तसे थरथरते. याच कारणावरून या पक्षाला कंपनपक्षी असे नाव पडले आहे. नर पक्षी रुबाबदार असून त्याचे डोके, पाठ व पंख कुळकुळीत काळ्या रंगाचे असतात. छातीला केशरी रंगाची छटा असते. मादी पूर्णपणे फिकट रंगाची असून तिच्या डोळ्याभोवती पिवळसर वलय असते. यामुळे या पक्षातील नर-मादीतील फरक सहज ओळखता येतो.

वृक्षराजीमुळे पक्षांचे आकर्षण

कंपन पक्षांची जोडी सकाळी व संध्याकाळच्या वेळी पार्कमधील विस्तृत हिरवळ व बोटिंगच्या पायरीजवळ भक्ष्य मटकावत वावरतानाचे दृश्य मनोहारी वाटते. पार्कमध्ये वाढलेल्या सुशोभित वृक्षराजीत चिमणीवर्गीय अनेक स्थानिक तथा स्थलांतरित पक्षी आकर्षित होतात, असे सयाजीराजे पार्कच्या व्यवस्थापिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी सांगितले.

कोट ::::::::::::::

कंपन पक्षी सयाजीराजे पार्कमध्ये २००९ पासून दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात हमखास येतात, हे आमच्या निरीक्षणावरून लक्ष्यात आले आहे. आम्ही सदर पक्ष्यांच्या खाद्य सवयी, राहनीमान व त्याच्या परतीचा प्रवास इत्यादी घटनाक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

- ऋतुराज कुंभार,

स्थानिक पक्षी निरीक्षक