शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

धर्मादाय संस्थांसाठी पुढच्या वर्षी सोलापुरात होणार अपील कोर्ट : दिलीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:43 IST

मार्च २१ मध्ये लोकार्पण : भविष्यात पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही

ठळक मुद्देसुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापुराला धर्मादाय सहआयुक्त कार्यालयास तत्वत: मंजुरी सोलापुरात मोठी इमारत नसल्याने सहआयुक्त कार्यालय सुरू झालेले नाही़ पुढच्या वर्षी नवीन इमारत सुरू होईल़ त्यानंतर सहआयुक्त कार्यालय आणि अधिकारी सोलापुरात रूजू होतील़

सोलापूर : सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे़ पुढच्या वर्षी मार्चमध्ये नूतन इमारतीचे लोकार्पण होणार आहे़ त्यानंतर सोलापुरात थेट धर्मादाय सहआयुक्त कार्यालय सुरू होणार आहे़ या कार्यालयास प्रादेशिक कार्यालयाचा दर्जा असणार असल्याची माहिती पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापुरात सुनावणीत समाधान न झालेले तक्रारकर्ते हे पुण्यातील सहआयुक्त कार्यालयाकडे अपील करतात. त्यामुळे  येथील नागरिकांना तसेच संस्था पदाधिकाºयांना दर मंगळवारी पुणे दौरा करावा लागतो़  पुढच्या वर्षापासून सहआयुक्त दर्जाचे अधिकारी सोलापुरातच सुनावणी घेतील़ अपील कोर्ट चालवतील़ त्यामुळे सोलापूरकरांची होणारी गैरसोय कायमची थांबेल़ अपील कोर्टमुळे तब्बल ३५ हजार धर्मादाय संस्थांना दिलासा मिळेल़ तसेच सोलापूर सोबत आणखी दोन जिल्ह्यांचे कामकाज देखील येथील सहआयुक्त कार्यालयातून चालेल़ यास उस्मानाबाद जिल्ह्यातील बार असोसिएशनचा ठराव संमत झाला आहे़ यासोबत सांगली जिल्हाही जोडण्याची शक्यता आहे.

सध्या सोलापुरात सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय कार्यरत आहे़ धर्मादाय आयुक्त म्हणून स्मिता माने या काम पाहत आहेत़ त्या न्यायिक अधिकारी असून हायकोर्टाकडून त्यांची नियुक्ती झालेली आहे़ त्यांच्या अंतर्गत तीन सहायक धर्मादाय आयुक्त पदे कार्यरत आहेत़ सहायक धर्मादाय आयुक्त म्हणून माधव बोराळे आणि राजेश परदेशी हे काम पाहत आहेत़ हे दोघेही न्यायिक अधिकारी आहेत़ दोघांची नियुक्ती हायकोर्टाकडून झाली आहे़ तिसºया सहायक धर्मादाय आयुक्त पद हे शासनाकडून नियुक्त झालेले आहे़ पण सध्या हे पद रिक्त आहे़ सहआयुक्त कार्यालय सुरु झाल्यानंतर सहआयुक्त दर्जाचे अधिकारी सोलापुरात रुजू होतील़ त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी देखील कामकाज पाहतील.

सध्या सोलापुरात सुनावणी झालेल्या प्रकरणाविरोधात पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्याकडे अपील करता येते़ सहआयुक्त देशमुख यांच्याकडील सुनावणी विरोधात थेट हायकोर्टात अपील करता येते़ सहआयुक्त कार्यालय सोलापुरात सुरु झाल्यास येथील प्रकरणांवर इथेच अपील करता येईल त्यानंतर थेट हायकोर्टात जाता येईल़ आतापर्यंत सर्व अपीलकर्ते पुण्याची वाट धरत होते़ पुढच्या वर्षापासून पुणे प्रवास थांबेल.

सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापुराला धर्मादाय सहआयुक्त कार्यालयास तत्वत: मंजुरी दिलेली आहे़ सोलापुरात मोठी इमारत नसल्याने सहआयुक्त कार्यालय सुरू झालेले नाही़ पुढच्या वर्षी नवीन इमारत सुरू होईल़ त्यानंतर सहआयुक्त कार्यालय आणि अधिकारी सोलापुरात रूजू होतील़ याकरिता पुणे येथील सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी खूप पाठपुरावा केला़ त्यांच्या प्रयत्नातून सहआयुक्त कार्यालय सुरू होईल़ तशी ग्वाही देखील त्यांनी नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिली़ विशेष म्हणजे, नवीन इमारतीत त्यांनी साडेतीनशे चौरस मीटर इतका मोठा हॉल बार असोसिएशनला देणार आहेत. यामुळे वकील बांधव तसेच नागरिकांची गैरसोय थांबेल़ - अ‍ॅड. नितीन हबीबज्येष्ठ विधीज्ञ, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेCourtन्यायालय