शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

टेबलावरील मेनूकार्डऐवजी अ‍ॅप; खवैय्यांची नोंद अन् डिजिटल पेमेंट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:13 IST

सहा महिन्यानंतर सोलापुरातील रेस्टॉरंट सुरू; सहकुटुंब हॉटेलिंगचा आनंद

ठळक मुद्देमागील सहा महिन्यात तेल,डाळी, बेसन या सर्वांचे दर वाढले आहेतव्यवसाय सुरळीत झाल्यानंतर दर वाढण्याची शक्यता आहेमागील सहा महिन्यांपासून हॉटेल सुरु होण्याची वाट पाहत आहे

सोलापूर : कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स्, रेस्टॉरंट्स सोमवारपासून सुरु झाले आहेत.  यामुळे आता सहकुटुंब हॉटेलिंगचा आनंद सोलापूरकरांना घेता येणार आहे.

हॉटेलात आलेल्या ग्राहकांच्या स्वागताबरोबरच त्यांना सॅनिटायझर, मास्क वापरण्याची विनंती करण्यात आली. पहिल्या दिवशी  ग्राहकांची संख्या कमी असली तरी ग्रामीण भागातून शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची संख्या जास्त असल्याचे व्यावसायिक प्रभाकर गौडनवरु यांनी सांगितले. चार जणांची क्षमता असलेल्या टेबलावर फक्त दोघे बसत आहेत. सध्या आचारीही कमी असल्याने मांसाहारी  पदार्थांची संख्या कमी आहे. इतके घरी साधे जेवण घेतल्याने आता  उत्तर भारतीय पदार्थांना पसंती मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली.

नव्या तंत्रज्ञानाचा अधिक वापर..कमीत कमी संपर्क व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये मेनूकार्ड ऐवजी क्यूआर कोडद्वारे अ‍ॅपचा वापर करून आॅर्डर घेतली जात आहे. तर झालेल्या बिलाचे पैसेही आॅनलाईन पेमेंटद्वारे दिले जात आहेत. ग्राहक येताना त्याची संपूर्ण माहिती नोंदवून घेतली जात आहे.

मागील सहा महिन्यांपासून हॉटेल सुरु होण्याची वाट पाहत आहे. वेगळी चव चाखण्यासाठी हॉटेलमध्ये आलो आहे. स्वत:ची काळजी म्हणून येथे येताना मास्क, सॅनिटायझर सोबत घेऊन आलो आहे.       -परशुराम कांबळे, ग्राहक 

प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहोत. सर्व कर्मचाºयांना एन-९५ मास्क, हँडग्लोव्हज वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. थोड्या दिवसात व्यवसाय पुर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.-नवनाथ  इंदापुरेहॉटेल व्यावसायिक

दरात बदल नाहीमागील सहा महिन्यात तेल,डाळी, बेसन या सर्वांचे दर वाढले आहेत. त्या अनुषंगाने दर वाढवणे गरजेचे होते; मात्र ग्राहक आर्थिक अडचणीत असल्याने दर वाढवले नाहीत. व्यवसाय सुरळीत झाल्यानंतर दर वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्या