शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:46 IST

पंढरपूर नगरपरिषदेचा २०१८-२०१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये कोणतीही करवाढ केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अंदाजपत्रक सादर केले.सर्वसाधारण सभेत २०१७-१८ चे सुधारित आणि २०१८-१९ च्या वार्षिक १०१ कोटी ६५ लाख ७० हजार २७० रुपये उत्पन्न आणि १०१ कोटी ६२ लाख ११ हजार ६५ रुपये अंदाजे खर्चासह तीन लाख ५९ हजार २०५ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचा २०१८-२०१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये कोणतीही करवाढ केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अंदाजपत्रक सादर केले.सर्वसाधारण सभेत २०१७-१८ चे सुधारित आणि २०१८-१९ च्या वार्षिक १०१ कोटी ६५ लाख ७० हजार २७० रुपये उत्पन्न आणि १०१ कोटी ६२ लाख ११ हजार ६५ रुपये अंदाजे खर्चासह तीन लाख ५९ हजार २०५ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी दिली.चौदावा वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान राज्यस्तर व जिल्हास्तर, रमाई                आवास योजना, श्रमसाफल्य            योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन सुरक्षा अभियान, यमाई तलाव सुशोभीकरण, सुजल निर्मल अभियान, प्राथमिक सोयी-सुविधा विकास योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुरक्षा योजनेसह रस्ते दुरुस्ती, नवीन पाईप खरेदी, रस्ते बांधणी, गटारे, नामसंकीर्तन सभागृह, नाट्यगृह, उद्यान विकास, पुतळ्याची सुधारणा व सुशोभीकरण, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी केल्या. सरकारच्या निर्णयान्वये अनधिकृत बांधकाम नियमित करून अर्थसंकल्पातील नवीन लेखाशीर्ष तयार करून अनियमित विकास कर आकारण्यात यावा यासाठी महसुली जमेस ५० लाखांच्या तरतुदीचा आणि नगरपरिषदेच्या जुने जलकुंभ  दुरुस्तीसाठी नव्या लेखाशीर्षात ३० लाखांच्या तरतुदीची सूचना स्थायी समितीपुढे ठेवली.------------------------सभा आटोपती घेतली जाणीवपूर्वक प्रश्न उपस्थित करून विरोधकांचा सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सत्ताधाºयांनी केला. त्याच कारणावरुन अर्धा ते पाऊण तासात अंदाजपत्रकाला मंजुरी देत सभा आटोपती घेतली.---------------------सभागृहात सीसीटीव्ही बसवासभेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण केले जावे, सभागृहात सीसीटीव्ही बसविण्याची पूर्तता का केली नाही, असा प्रश्न करून सभेचे कामकाज थांबविण्याचा प्रयत्न नगरसेवक महादेव भालेराव यांनी केला. सत्ताधाºयांकडून व नगरपरिषदेच्या अधिकाºयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विरोधकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घातला. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर