शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:27 IST

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला.

ठळक मुद्देमोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला : अण्णा हजारे पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही : अण्णा हजारे तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल : अण्णा हजारे

आॅनलाइन लोकमत सोलापूरआळंद दि २९ : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे व शेतकºयांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या साडेतीन वर्षात मोदींनी काहीच केले नसल्यामुळे हे वचन भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कलबुरगी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला. शेतकºयांच्या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने कलबुरगी येथील शरणबसवेश्वर संस्थान मैदानावर अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नवी दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ.एस.ए.पाटील कलबुरगीच्या श्रीगुरू विद्यापीठाचे अध्यक्ष बसवराज दिग्गावी, जेष्ठ पत्रकार श्रीनिवास शिरनूरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकºयांच्या प्रश्नावर व प्रशासनातील भ्रष्टाचारावर आपली परखड मते मांडली. हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील हे अध्यक्षपदी होते. दयानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेचे धर्मेंद्र उद्देष सादर केले.  यावेळी बोलताना अण्णा पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला असून पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी आत्महत्येविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की,बँका व सावकारी जबर कर्जाच्या दबावामुळे गेल्या १२ वर्षात एकूण २२ लाख शेतकºयांनी आत्महत्त्या केल्या आहेत पण माझी शेतकºयांना विनंती आहे की,यापुढे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. राज्या राज्यात कृषीमुल्य आयोग कार्यरत आहेत पण या आयोगाच्या शिफारशीला केंद्र सरकार पन्नास टक्के कात्री लावते हे अन्याकारक आहे असे स्पष्ट करत अण्णा पूढे म्हणाले की, उद्योगपतींना धार्जिणे असलेल्या या केंद्र सरकारला शेतकºयांविषयी अजिबात काळजी नाही. कर्नाटकातील विद्द्यमान महादायी योजनेविषयी चाललेल्या वादविवादावर बोलताना अण्णा म्हणाले की, यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असून प्रश्न सोडविण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अनेक राज्यांना पाणी वाटपाच्या समस्येने ग्रासले असून नेते असे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यामध्ये राजकीय लाभाचा विचार करून प्रश्र्न लोंबकळत ठेवतात हे लोकशाहीमध्ये अत्यंत लाजीरवाणे आहे. या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. विजयपूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे यावेळी सानिध्य लाभले होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरanna hazareअण्णा हजारे