शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी तालुक्यातील आरोग्य कर्मचाºयांच्या संतापले; काय आहे कारण जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:25 IST

दोन महिन्यांत दोनदा कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीही १९ कैदी सेंटरमध्येच

ठळक मुद्दे१ व ३ जुलै रोजी हे २६ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेल्या शासकीय वसतिगृहात दाखल केले़रुटीन उपचारानंतर ते बरे झाले़ आजपर्यंत या सर्व कैद्यांची दोनवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली़दरम्यान, २६ पैकी ७ कैद्यांना जामीन झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे

बार्शी :   पॉझिटिव्ह कैद्यांची दोनवेळा केलेली टेस्ट निगेटिव्ह येऊन ते कोविड सेंटरमध्येच आहेत़ त्यांचा आम्हाला त्रास होत असल्याच्या तक्रारी बार्शीच्या आरोग्य कर्मचाºयांनी केल्या आहेत़ बार्शी सबजेलमधील २६ कैदी पुन्हा जेलमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. 

१ व ३ जुलै रोजी हे २६ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेल्या शासकीय वसतिगृहात दाखल केले़ यातील कोणत्याच कैद्याला जास्त लक्षणे दिसत नसल्याने त्रास झाला नाही़ रुटीन उपचारानंतर ते बरे झाले़ आजपर्यंत या सर्व कैद्यांची दोनवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली़ दोन्ही वेळेस त्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत़ दरम्यान, २६ पैकी ७ कैद्यांना जामीन झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ उर्वरित १९ कैदी या ठिकाणी आहेत़ यापूर्वी आरोग्य विभागाने बैठकीत व लेखी पत्र देऊन या कैद्यांना सबजेलमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी केली आहे. 

आम्ही याबाबत आरोग्य विभागाकडून कैद्यांच्या टेस्ट संदर्भात माहिती मागवली आहे़ सबजेल दररोज सॅनिटाईज केले जात आहे़ आरोग्य विभागाचा अहवाल येताच कैद्यांना कोविड सेंटरमधून सबजेलमध्ये हलविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल़     - किरण जमदाडे,    प्रभारी तहसीलदार, बार्शी 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbarshi-acबार्शी