शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

झोपलेल्या वृद्धावर काेयत्याने हल्ला पोंधवडीतील घटना; हाताचे बोट तुटले, करमाळ्यात उपचार सुरू

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 16, 2024 16:53 IST

मध्यरात्री जेवन आटोपून बाजेवर झोपलेल्या वृद्धावर अनोळखी व्यक्तींनी धार-धार काेयत्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले.

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : मध्यरात्री जेवन आटोपून बाजेवर झोपलेल्या वृद्धावर अनोळखी व्यक्तींनी धार-धार काेयत्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचे हाताचे एक बोटही तुटले. या घटनेनंतर हल्लेखोर रात्री अंधारात फरार झाले.सुखदेव बाबा क्षीरसागर (वय ७६, रा. पोंधवडी, ता. करमाळा) असे जखमी वृद्धाचे नाव असून सोमवार, १५ जानेवारी रोजी मध्यरात्री पोंधवडी येथे ही घटना घडली.

सोमवार रात्री जेवण उरकून सुखदेव क्षीरसागर हे त्यांच्या वस्तीसमोर लाकडी बाजेवर झोपले होते. दारात विजेचा बल्ब चालू होता. मध्यरात्रीनंतर अनोळखी व्यक्ती आले आणि प्रथम वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने ऊसतोड कोयत्याने डोक्यावर व तोंडावर वार केल्याने सुखदेव हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचे एक बोट तुटले आहे. डोक्याला जबर मार लागला आहे. त्यानंतर हल्लेखोर अंधारात पळून गेले. जखमी क्षीरसागर जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या आवाजाने नातेवाईक जागे झाले. त्यांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना करमाळा येथे आणले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसात अनोळखी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे.