शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

स्वकष्टातून मूर्ती स्थापली, द्राक्ष आरासात गाभारा फुलला, अडीच तास कीर्तन रंगले अन् समर्थांचा पाळणाही झाला

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 23, 2023 19:58 IST

हत्तुरेवस्तीत अडीच तास कीर्तन चालले तर कोनापुरे चाळीतील स्वामी भक्तांनी तीन तासात दोन क्विंटल महाप्रसाद बनवून भक्तांच्या मुखात घातला. 

सोलापूर : बहुजाती, बहुभाषा अन बहुविध सण उत्सवप्रिय सोलापुरात गुरुवारी स्वामी समर्थांचा प्रकट दिन विविध उपक्रमांनी पार पडला. अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळाच्या वतीने पाळणा गुलालाने प्रकट दिन पार पडला तर सोलापूर शहरात उद्धवनगरमध्ये एका भक्ताने स्वखर्चातून मूर्ती स्थापन केली. सुंदरम नगरमध्ये मंदिराचा गाभारा द्राक्षांच्या आरासाने फुलला. हत्तुरेवस्तीत अडीच तास कीर्तन चालले तर कोनापुरे चाळीतील स्वामी भक्तांनी तीन तासात दोन क्विंटल महाप्रसाद बनवून भक्तांच्या मुखात घातला. 

 सोलापूर जिल्ह्यात शहरात आणि ग्रामीण भागात स्वामी समर्थांचा प्रकट दिन दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जाताे. विजापूर रोडवर सुंदरम नगरमध्ये यंदा माजी अध्यक्ष दिलीप राऊत यांनी नान्नज येथून शंभर किलो द्राक्ष आणली. स्वामी समर्थांचा गाभारा यंदा द्राक्षांनी सजला.  अक्कलकोटमध्ये अनच्छत्र मंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रम पार पडला. सोलापूर शहरात आसरा सोसायटीत भैरवनाथ स्वामी समर्थ मंदिरात महिलांनी सामुहीक पारायण केले अन सायंकाळी दीड किलो मीटर वाजत-गाजत पालखी सोहळा काढला.तसेच कोनापुरे चाळीत बाबा करगुळे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली चक्क तीन तासात दोन टन महाप्राद बनवून तो भाविकांना वाटला. विजापूर रोडवर उद्धव नगर येथे मनोजकुमार अलकुंटे हे गेली १४ वर्षे स्वामी समर्थांच्या प्रितिमेचे पूजन करुन प्रकट दिन पार पाडायचे. त्यांनी तेंव्हापासून पैसे बचत करीत यंदा जमलेल्या स्वत:च्या ५१ हजारातून पंढरपुरात ११ दिवसात स्वामींची मूर्ती बनवून घेतली. ती आज स्थापन करुन स्वत:मधील भक्ती व्यक्त केली. तसेच दिवसभरात १४ तास भजन चालले. 

 

टॅग्स :Solapurसोलापूर