शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात पीक कर्जाच्या वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांची आघाडी, जिल्हा मध्यवर्ती बँक मागे

By admin | Updated: June 30, 2017 12:52 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : एकीकडे कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जबाकी भरण्यासाठी शेतकरी व नव्याने कर्ज देण्यासाठी बँका उदासीन असतानाच खरिपासाठी आतापर्यंत जिल्हाभरातील बँकांनी ४०४ कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे १५९० कोटी ४३ लाख रुपये इतके उद्दिष्ट आहे. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीला वेग आला आहे. मागील वर्षी जून अखेरला पावसाने सुरुवात केली होती त्यामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या तिप्पट झाले होते. यावर्षी चार जूनपासूनच जिल्ह्णात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत पेरणीसाठी बँकांकडून जुने कर्ज भरणे व नव्याने कर्ज मागणे तसेच अनेक शेतकरी प्रथमच पीक कर्ज घेत आहेत. पाऊस चांगला असल्याने बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे कर्ज वाटपाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका तसेच ग्रामीण बँकेने आतापर्यंत ४०४ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका पुढे आहेत.---------------------कर्ज वाटपाचा वेग मंदावला- जिल्हा मध्यवर्ती बँकेने १४ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५ कोटी ९१ लाख रुपये वाटप केले असून, मागील वर्षी याच कालावधीत १९१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले होते.- ग्रामीण बँकेने ७१५ शेतकऱ्यांना ९ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीत १२ कोटी ९२ लाख रुपये कर्ज वाटले होते.- राष्ट्रीयीकृत बँकांनी १८ हजार ७६९ शेतकऱ्यांना २८८ कोटी ४४ लाख रुपये इतक्या कर्जाचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीपर्यंत २३१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले ़- २७ जूनपर्यंत एकूण ४०४ कोटी कर्ज वाटप झाले असून, मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ४३६ कोटी ४८ लाख रुपयांचे वाटप झाले होते.----------------------जिल्हा बँक शून्यावरच...कर्जदार शेतकऱ्यांना तर कर्ज दिलेच पाहिजे शिवाय नव्या सभासदांनाही कर्ज देणे बंधनकारक आहे. जिल्हा बँकेने मात्र नव्या एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. ग्रामीण बँकेने २२ तर राष्ट्रीयीकृत बँकांनी २५ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिले आहे. मागील वर्षीपेक्षा ८६ कोटी कर्जाचे वाटप कमी करणाऱ्या जिल्हा बँकेने नव्याने एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही.------------------आमच्याकडे पैसे नाहीत हे आम्ही सांगत आहोत. कारखानदार, शिक्षण संस्थांप्रमाणेच शेतकऱ्यांनीही घेतलेले कर्ज भरण्यासाठी पाठ फिरविल्याने इच्छा असूनही कर्ज देऊ शकत नाही.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक