शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अक्कलकोटच्या सेंद्रिय गुळाने देशासह आॅस्ट्रेलिया, जर्मन, इंग्लंडमध्ये खाल्ला ‘भाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 19:53 IST

शिवानंद फुलारी  अक्कलकोट : सांगवी बु।। (ता. अक्कलकोट) येथील सेवानिवृत्त शिक्षक सोमेश्वर गुरव हे सेंद्रिय शेतीद्वारे गूळ निर्मिती करीत ...

ठळक मुद्देसेवानिवृत्त शिक्षक गुरव यांनी अचलेर (ता. उमरगा) येथे तब्बल ३३ वर्षे नोकरी करून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झालेदरवर्षी किमान पाच एकर उसाची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने ते जोपासत आहेत.

शिवानंद फुलारी अक्कलकोट : सांगवी बु।। (ता. अक्कलकोट) येथील सेवानिवृत्त शिक्षक सोमेश्वर गुरव हे सेंद्रिय शेतीद्वारे गूळ निर्मिती करीत असून, हा सेंद्रिय गूळ अक्कलकोट येथील डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या माध्यमातून शिवपुरी संस्थानकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. त्यांच्याच माध्यमातून डोंबिवली, खारघर, पुणे, मंगळवेढा, सोलापूर, बार्शीसह परदेशात आॅस्ट्रेलिया, जर्मन, इंग्लंड या देशात विकला जात आहे. तेथील बाजारपेठेत मोठी मागणी असून, प्रतिकिलो ८० रुपये दरही मिळत आहे. तालुक्यात विषमुक्त शेतीचा नवा पायंडा घालणाºया  गुरव यांचा आदर्श इतर शेतकरी घेत आहेत.

सेवानिवृत्त शिक्षक गुरव यांनी अचलेर (ता. उमरगा) येथे तब्बल ३३ वर्षे नोकरी करून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच ते सेंद्रिय शेतीचा छंद बाळगून होते. ते १० वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. दरवर्षी किमान पाच एकर उसाची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने ते जोपासत आहेत.

गूळ बनविण्यासाठी स्वतंत्र गूळघर बनविण्यात आले असून, गूळ तयार करण्यासाठी मनुष्यबळ व रोजचा खर्च असला तरी, सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची पत टिकून राहते. विषमुक्त शेतीमुळे रासायनिक खते हद्दपार होऊन हल्ली वाढत असलेल्या कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावणार नाहीत. तालुक्यात आतापर्यंत १० ते १५ शेतकरी अशा शेतीचा प्रयोग करीत असून, त्यांना यशही येत आहे. सेवानिवृत्त शिक्षक गुरव यांना उच्चशिक्षित मुलगा राहुल याचेही चांगले सहकार्य मिळत आहे.

प्रक्रिया अन् काळजी- रासायनिक खत किंवा औषधांचा वापर न करता सेंद्रिय पद्धत अवलंबण्यासाठी जीवामृतसारखी प्रक्रिया ते करीत आहेत. उसाला शेण खत, गांडूळ खत, पतंजली खत, जीवामृत याचा वापर करण्यात येत असून, याला भरपूर खर्च होत असला तरी रासायनिक अंश यात मिसळला जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. 

दहा वर्षांपूर्वी सेंद्रिय शेती व त्याचे फायदे जाणून घेतले. त्यानंतर यात उतरण्याचा निर्णय घेतला. सलग तीन वर्षे रासायनिक खतांचा वापर बंद केल्यानंतर खºया अर्थाने सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. सध्या दोन एकर गाळप झाले असून, आणखीन २ एकर ऊस गाळपास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीचा मार्ग शेतकºयांनी अवलंबवावा.-सोमेश्वर गुरव, सेवानिवृत्त शिक्षक, सांगवी बु।।

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय