पायाखालची वाळू घसरल्यानेच अजित पवार घरोघरी फिरताहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:12+5:302021-04-16T04:22:12+5:30

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात साखर कारखाने आजारी झाले की ते विकत घ्यायचा सपाटा पवार कुटुंब करीत आहेत. आता त्यांनी ...

Ajit Pawar is walking from house to house due to sand falling under his feet! | पायाखालची वाळू घसरल्यानेच अजित पवार घरोघरी फिरताहेत!

पायाखालची वाळू घसरल्यानेच अजित पवार घरोघरी फिरताहेत!

Next

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात साखर कारखाने आजारी झाले की ते विकत घ्यायचा सपाटा पवार कुटुंब करीत आहेत. आता त्यांनी आपल्याकडील कारखान्याच्या माहितीची श्वेतपत्रिका काढावी. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही. आता मंत्र्यांची पुढे मालिकाच असून कोणाही भ्रष्ट मंत्र्याची सुटका नाही.

अजित पवार यांनी कालचक्र फिरत असते याची जाणीव ठेवावी, असे सांगत आता राज्यात सत्तांतर कसे होईल, कधी होईल हे सर्व तुम्हाला माहीत आहे, मात्र जे सत्तांतर होईल ते आमच्या जीवावर होईल, असे संकेतही त्यांनी दिले.

------

सरकार कुणाचंही असो पवारच उपमुख्यमंत्री..

अजित पवार यांना काय झालंय माहीत नाही. परंतु ते अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. माझी शरद पवार यांच्यावरील पीएच.डी. अजून पूर्ण झाली नसली तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एम. फील करणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की, हेच उपमुख्यमंत्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की हेच उपमुख्यमंत्री. सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच.. असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Web Title: Ajit Pawar is walking from house to house due to sand falling under his feet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.