शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:54 IST

जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे.

सचिन कांबळे -

पंढरपूर : मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी लढणारे जरांगे पाटील यांच्यावर जारांगे खोटारडा माणूस आहे, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका होतात, असे गंभीर आरोप पत्रकार परिषदांमधून करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी जळाली आहे. जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे.

बारस्कर यांनी त्यांची दहा लाख रुपये किंमतीची एमएच १२ बीपी २००१ या क्रमांकाची कार चंद्रभागा नदी पलीकडील ६५ एकर येथील पार्किंगमध्ये पार्क केली होती. ही कार आषाढी एकादशी (बुधवार) दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जळाली आहे. मात्र याबाबतची माहिती गुरूवारी पोलिसांनी माध्यमांना दिली. ही कार जाळून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार अजय साहेब बारस्कर ( वय ४४, भंडार डोंगर, सुदवडी देहू, ता. मावळ, जिल्हा पुणे) यांनी दिली आहे. कारला आग कशामुळे लागली. कोणी लावली याच्या मागे कोणी आहे का नाही याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत अजय महाराज बारस्कर यांना विचारले असता त्यांनी कार जाळण्यामागे जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. यामुळे आजही मराठा समाज आक्रमक असल्याचे दिसून आले आहे.

"मी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मला सतत धमक्या येत असतात. माझी कार जरांगे पाटलांच्या समर्थकांनी जाळली असल्याची मला खात्री आहे. याबाबत मी पोलिसांना हे सांगितले आहे," अजय महाराज बारस्कर म्हणाले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण