शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवेस हिरवा कंदील

By admin | Updated: August 8, 2014 01:12 IST

विजयसिंह मोहिते-पाटील : नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचना

अकलूज : सोलापूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजकांच्या सोईसाठी सुरू करण्यात येणाऱ्या सोलापूर-मुंबई विमान वाहतूक सेवेस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी हिरवा कंदील दाखविला असून अधिकाऱ्यांना या वाहतुकीसाठी तातडीने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.खा. मोहिते-पाटील म्हणाले, ‘सुप्रीम एअरलाईन्स’ या कंपनीच्या माध्यमातून १५ आॅगस्टपासून नियमित विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे नाहरकत प्रमाणपत्र हवे आहे. त्यादृष्टीने आपण केंद्रीय मंत्री राजू यांची भेट घेतली व त्यांना या विमान वाहतुकीची व्यापारी, उद्योजक यांना किती गरज आहे हे पटवून दिले. राजू यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याविषयी सूचना केल्या. खासदारपदी निवड झाल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार खा. मोहिते-पाटील यांनी ‘सुप्रीम एअरलाईन्स’ या खासगी विमान कंपनीशी चर्चा केली. कंपनीचे अमित अग्रवाल यांनी सोलापूरसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार १५ आॅगस्टपासून सोलापूर-मुंबई ही ९ सीटची विमानसेवा सुरू होईल, असे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. परंतु केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ही सेवा सुरू करता येत नसल्यामुळे खा. मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री राजू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी खा. धनंजय महाडिक उपस्थित होते. -----------------------------सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक यांना विमानसेवेची गरज आहे, हे पटवून दिल्यानंतर राजू यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याविषयी सूचना केल्या. नियमित विमानसेवेमुळे सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीला गती मिळेल.- विजयसिंह मोहिते -पाटीलखासदार, माढा