शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हमरी-तुमरीनंतर बस चालकाने वाहकास सोडून एस़टी पुढे नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:22 IST

दोघांच्या भांडणात प्रवाशांचा फुकट प्रवास, नान्नज बस स्टॉपवरील प्रकार

ठळक मुद्देबसमधील वाहक आनंद उबाळे यांनी भांडीविक्रेत्यासोबत चालकाचा वाद सुरू असताना समजावण्याचा वारंवार प्रयत्न केलाचालकाच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. वाद वाढल्याने चालकाने भांडीविक्रेत्यासह बसचे वाहक आनंद उबाळे यांनाही खाली उतरवले.

वडाळा : बसमध्ये भांडी घेऊन प्रवासासाठी चढलेल्या भांडी विक्रेत्याशी झालेल्या वादात बसच्या वाहकाने चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे भडकलेल्या बसचालकाने चक्क भांडीविक्रेता प्रवासी आणि बसवाहकाला उतरवून बस पुढे नेल्याचा प्रकार बुधवारी घडला.

२६ मार्चला दुपारी १२ वाजता नान्नज येथे बार्शी आगाराची एसटी बस (एम.एच. १४- ९२७१) आपल्या फेºया पूर्ण करत नान्नज बस स्टॉपवर पोहोचली. काही प्रवासी बसमध्ये चढले. त्यामध्ये एक भांडी विक्री करणारा व्यावसायिकही होता. त्याच्याकडील भांडी पाहून चालक राजाराम नंदवटे यांचे माथे भडकले. बसमध्ये भांडी व साहित्य नको, असे म्हणत त्या प्रवाशासोबत उद्धट वर्तन केले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. 

चालकाच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. वाद वाढल्याने चालकाने भांडीविक्रेत्यासह बसचे वाहक आनंद उबाळे यांनाही खाली उतरवले. बसमध्ये आणखी प्रवासी चढत असताना त्यांना एसटीमध्ये न घेताच बस सुरू केली व पुढच्या गावाला नेली.नान्नज बस स्टॉपवरून वडाळा येथील प्रदीप पवार यांनाही वडाळा गावी जायचे होते. परंतु त्यांनाही एसटीमध्ये घेतले नाही. तशीच एसटी घेऊन पुढे निघून गेले. त्यामुळे प्रदीप पवार यांनी वडाळा येथील शशिकांत खडके यांना त्यांनी मोबाईलवरून ही माहिती दिली. दरम्यान, वडाळा येथील काही नागरिकांनी चालकास एसटी थांबविण्यास भाग पाडले. 

केमवाडी येथील हरिदास माधव काळे हे सोलापूरहून वडाळ्यासाठी याच बसने निघाले होते. वडाळा येथून एसटीमध्ये चढणाºया प्रवाशांना त्यांनी बसमध्ये वाहक नसल्याने प्रवास करू नका, असे सुचविले. मात्र चालक राजाराम नंदवटे वेगळ्याच फॉर्मात होते. चला आज एसटी तुमच्यासाठी फुकट आहे, असे म्हणून प्रवाशांना ते विनातिकीट पुढे घेऊन निघून गेल्याचे सांगण्यात आले.

वाहकाने वादात केली होती मध्यस्थी...

बसमधील वाहक आनंद उबाळे यांनी भांडीविक्रेत्यासोबत चालकाचा वाद सुरू असताना समजावण्याचा वारंवार प्रयत्न केला. तुम्ही केबिनमध्ये पाहा, आतील प्रवाशांशी कोणत्याही प्रकारचे उद्धट वर्तन करू नका, बाकी मी सांभाळतो. तुम्ही बस चालविण्याचे तुमचे काम करा, असे सांगितले. मात्र त्यामुळे चालक राजाराम नंदवटे यांना त्यांचा राग आला. यामुळे भांडीविक्रेत्यासह बसवाहकालाही उतरविण्याचा प्रकार घडला. दोन दिवसांपासून बसचालक प्रवाशांशी उद्धट वर्तन करत होते, असे वाहक आनंद उबाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संप