शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा विश्वास जिंकून साखर कारखान्याचा चिटबॉय बनला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 13:09 IST

वडवळमध्ये ६५ वर्षात प्रथमच अनुसूचित जातीला गावकारभाऱ्याची संधी

महेश कोटीवाले वडवळ : ‘काहीही होवो सत्तेची खुर्ची आपल्याच घरात राहिली पाहिजे’ या व अशा अनेक इच्छेपायी राज्यात सर्वत्र  ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीने  लढवल्या गेल्या. वडवळ ग्रामपंचायतीमध्ये ६५ वर्षातून प्रथमच अनुसूचित जातीच्या जागेसाठी सरपंच पद आरक्षण जाहीर झाले अन एका साखर कारखान्याचे माजी चिटबॉय जालिंदर बनसोडे हे आता सरपंच म्हणून निश्चीत झाले आहेत.

वडवळ ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ साली झाली व निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आरक्षण प्रक्रिया ही १९९५ पासून सुरु झाली. या एकूण ६५  वर्षाच्या कालावधीत प्रत्येक निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून येत होते मात्र त्यांना कधी सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली नाही.  वडवळ ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांनी बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला होता. दोन्ही गटाकडून अनुसूचित जातीच्या जागेसाठी जालिंदर बनसोडे यांची निवड करण्यात आली. बनसोडे यांनी यापूर्वी उपसरपंच पदावर काम केले आहे. तालुक्यातील एका साखर कारखान्यामध्ये त्यांनी चिटबॉय म्हणून काम केले आहे. आता त्यांना गावचे सरपंच पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. त्यांची बिनविरोध निवड होताच गावात विविध व्यक्ती,संस्था यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा व लोकशाहीचा हा विजय आहे. गावाचा विकास करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवू. सर्वांना सोबत घेऊन विकास काम करण्यावर आपला भर असेल.  - जालिंदर बनसोडे, सरपंच उमेदवार, वडवळ.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायत