बार्शी : श्रीपत पिंपरी येथे ३५ वर्षांपासून बटईने जमीन करत असलेल्या एका शेतक-याने मळणी केलेला उडीद बैलगाडीत भरून झापून ठेवला होता. चोरट्यांनी या चार क्विंटल उडदावर डल्ला मारत ताडपत्रीही
पिंगळे वस्तीवरुन हे उडीद चाेरट्यांनी पळविले. याबाबत चंद्रकांत हंबीरराव पिंगळे (वय ४५, रा. पिंगळे वस्ती, श्रीपत पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
गावातील बाळासाहेब ताकभाते यांची दहा एकर जमीन गेली ३५ वर्षांपासून बटईने करतात. यावर्षीही चंद्रकांत पिंगळे यांनी सव्वा एकरात उडीत लागवडी केली. तीन दिवसांपूर्वी काढून त्याची मळणी केली. सहा कट्टे उडीद त्यांनी पिंगळे वस्ती येथे बैलगाडीत भरून पावसात भिजू नये म्हणून रोड लगत वस्तीवर ताडपत्रीने झाकून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून डेअरीस दूध घालण्यास निघाले असता गाडीतील उडीद गायब होता. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता हा उडीद चोरट्यांनी ताडपत्रीसह पळविल्याचे स्पष्ट झाले.