शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

एलबीटी हटावनंतर आता चेंबर भवन उभारण्याचा निर्णय

By admin | Updated: October 22, 2015 21:11 IST

सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष विश्‍वनाथ करवा. व्यासपीठावर डावीकडून राजगोपाल झंवर, किशोर चंडक, बसवराज दुलंगे, सिद्धेश्‍वर बमणी, प्रभाकर वनकुद्रे, धवल

 सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष विश्‍वनाथ करवा. व्यासपीठावर डावीकडून राजगोपाल झंवर, किशोर चंडक, बसवराज दुलंगे, सिद्धेश्‍वर बमणी, प्रभाकर वनकुद्रे, धवल शहा, पशुपती माशाळ, नीलेश पटेल, राजू राठी आदी. सोलापूर : महाराष्ट्रातील तमाम व्यापार्‍यांना मुक्त व्यापाराची संधी देणारे मिशन एलबीटी (स्थानिक संस्था कर) हटावच्या यशस्वीतेनंतर आता सोलापुरात चेंबर भवन उभे करण्याचा निर्णय सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष विश्‍वनाथ करवा होते.प्रारंभी चेंबरचे मानद सचिव धवल शहा यांनी स्वागत केले. नरेंद्र पाठक यांनी मागील सभेचा इतवृत्तांत सादर केला. नीलेश पटेल यांनी गतवर्षीचा ताळेबंद व आयव्यय पत्रक सादर केले. राजू राठी यांनी चेंबरची ही सभा विजयोत्सवाची असल्याचे सांगून एलबीटी रद्द करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. एलबीटी तर रद्द झालीच शिवाय दंड व व्याज यातून मुक्ती मिळण्यासाठी शासनाकडे अभय योजना सादर केली आणि ती मंजूर करुन घेतल्याचेही त्यांनी सांगितले.प्रभाकर वनकुद्रे म्हणाले, व्यापारी बांधवांनी एकत्रित येऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्याची गरज असून मुक्त व्यापारासाठी समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने पायबंद घालण्याचे धाडस दाखवावे.यावेळी एलबीटी लढा यशस्वीरित्या देऊन अपेक्षित यश व अभय योजनेचा लाभ चेंबरचे माजी अध्यक्ष सिद्धेश्‍वर बमणी यांच्या कार्यकाळात झाल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष विश्‍वनाथ करवा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विश्‍वनाथ करवा यांनी भावी काळात सोलापुरात चेंबर भवन उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी माजी खा. धर्मण्णा सादूल, प्रकाश वाले, अशोक मुळीक, पशुपती माशाळ, खोत, क्षीरसागर, बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) दुष्काळ जाहीर करा.. ■ सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत शासनाने समावेश न केल्याबद्दल चेंबरच्या सभेत आश्‍चर्य करण्यात आले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन देऊन सोलापूरचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्यासाठी आग्रह धरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.