शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदीनंतर सोलापूरात रद्दीचा वापर अन् मागणीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:28 IST

दर स्थिर : प्लास्टिक बंदीनंतर धान्यांसाठी गुळगुळीत पेपर

ठळक मुद्देघाऊक बाजारात आणि भाजीमंडईतही रद्दी पेपरचापर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णयजुन्या आठवणीही जाग्या झाल्या़ निर्णय स्वागतार्ह

काशिनाथ वाघमारे सोलापूर : प्लास्टिक बंदीला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ शहरात प्लास्टिकऐवजी रद्दी पेपरचा वापर वाढला आहे़ पूर्वी प्लास्टिकमध्ये दिले जाणारे मटण आणि हवाबंद स्थितीतील दाळीही गुळगुळीत कागदात दिल्या जात आहेत.शासनाच्या निर्णयाचा चांगलाच परिणाम दिसून येतोय़ 

शहरात रद्दी विक्रेत्यांकडे रद्दी पेपरपेक्षा मासिक आणि गुळगुळीत इंग्रजी पेपरची मागणी आणि वापर वाढलेला दिसून येतोय़ मटण व्यवसायावरही याचा परिणाम झालेला दिसून येतोय़ आता गुळगुळीत इंग्रजी पेपरमध्ये काही ठिकाणी मटण दिले जातेय़ अनेक ठिकाणी बाजारपेठेत व्यापाºयांनी पाच हजार रुपयांच्या दंडाच्या भीतीने दुकानातून प्लास्टिक पिशवी काढून टाकली आहे़ दुकानदार कापडी पिशव्या आणि गुळगुळीत पेपरमध्ये वस्तू देत आहेत़ अगदी भाजी मंडईतदेखील उसळ ही गुळगुळीत पेपरमध्ये दिली जात आहे़ त्यामुळे मिलला जाणारा पेपर आणि मराठी रद्दी याचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आणि त्याचा स्थानिक पातळीवर वापर आणि दुकानदारांकडून विक्री वाढली आहे़ 

दूध पिशव्यांची आवक घटलीप्लास्टिक बंदीचा फटका काहीअंशी रद्दी विक्रेत्यांना झालेला दिसून येतोय़ दूध पिशव्यांचा सर्वाधिक दर होता; मात्र शासनाच्या बंदीनंतर दूध पिशवीचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे रद्दी विक्रेत्यांनी सांगितले़ या प्लास्टिक बंदीबाबत रद्दी विक्रेत्यांमध्येही काहीअंशी संभ्रमावस्था आहे़ या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे रद्दी विक्रेत्यांनीही स्वागत केले आहे़    दर तोचप्लास्टिक बंदीनंतर कापडी पिशव्या आणि रद्दीचा वापर वाढेल आणि त्यांचा दरही वाढेल अशी अपेक्षा होती; मात्र किरकोळ व्यवसाय असल्याने कुठेही दरवाढ दिसून आलेली नाही; मात्र वापर आणि मागणी वाढल्याचे निदर्शनास आले नाही़ मराठी पेपर हा १२ रुपयांनी ग्राहकांकडून घेतला जातो तर वापरासाठी ग्राहकांना तो १५ रुपयांनी विकला जातो़ 

प्लास्टिक बंदीचे स्वागतच करतो आहे़ घरामध्ये आलेले मराठी वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर काही बातम्या, लेख कात्रण करतो़ त्यानंतर आठ दिवसात जमा झालेल्या रद्दी पेपरच्या कागदी पिशव्या करुन घरी वापरतो आहे़ ही संकल्पना गल्लीमधील अनेकांना आवडली़ अनेकांनी हाच प्रयोग सुरु केला आहे़ काही विद्यार्थीही कागदी पिशव्या बनवून घरोघरी देत आहेत़         - नेहा पुल्ला (ग्राहक)

घाऊक बाजारात आणि भाजीमंडईतही रद्दी पेपरचा वापर होत आहे़ हे व्यापारी गल्लीतील अनेकांकडून रद्दी गोळा करून नेत आहेत़ रद्दी दुकानापर्यंत जाऊन विकण्याचा त्रास कमी झाला आहे़ पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला आहे़ अगदी गूळ आणि कच्ची उसळदेखील कागदाच्या पुड्यात विक ली जात आहे़ यामुळे जुन्या आठवणीही जाग्या झाल्या़ निर्णय स्वागतार्ह आहे.- श्रीमंत आयवळे (ग्राहक) 

टॅग्स :SolapurसोलापूरPlastic banप्लॅस्टिक बंदी