शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४५ वर्षांनी २७ मिळकतींच्या ‘सात-बारा’वर लागले सोलापूर महापालिकेचे नाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:15 IST

मनपा आयुक्तांनी घेतली मोहीम : ६०० कोटींचा फायदा झाल्याचा दावा

ठळक मुद्देशहर नगररचना योजनेतून १९७३ झाली ५२ मिळकती महापालिकेला मिळाल्या२७ मिळकतींच्या सातबारा उताºयावर तब्बल ४५ वर्षांनी महापालिकेचे नाव लागलेजवळपास ६०० कोटींची मालमत्ता असल्याचा दावा मनपाच्या भूमी व मालमत्ता विभागाने केला

राकेश कदमसोलापूर : शहर नगररचना योजनेतून १९७३ झाली ५२ मिळकती महापालिकेला मिळाल्या होत्या. यातील २७ मिळकतींच्या सातबारा उताºयावर तब्बल ४५ वर्षांनी महापालिकेचे नाव लागले आहे. पुढील महिन्यात उर्वरित २५ मिळकती महापालिकेच्या ताब्यात येतील. ही जवळपास ६०० कोटींची मालमत्ता असल्याचा दावा मनपाच्या भूमी व मालमत्ता विभागाने केला आहे. 

सोलापूर शहर नगररचना योजना क्र. ४ ही विभागीय विकास सरकारी योजना १० आॅक्टोबर १९७३ साली मंजूर झाली होती. १ डिसेंबर १९७३ पासून हा आराखडा अंमलात आला. यावेळी शहरातील अनेक जागा महापालिकेला बक्षीसपत्र   म्हणून मिळाल्या. यातील ५२  जागांच्या सातबारा उताºयांवर महापालिकेचे नाव लागलेले               नव्हते. याचा फायदा घेऊन मिळकतदारांच्या पुढील पिढीने या जागा विक्री करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये स्मशानभूमी, शाळांसाठी आरक्षित असलेल्या जागांचाही समावेश होता. वर्षभरापूर्वी जुळे सोलापुरात शाळेसाठी आरक्षित असलेली जागा परत मिळावी, असा अर्ज महापालिकेला सादर करण्यात आला होता. सात महिन्यांपूर्वी हे प्रकरण मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे आले. त्यांनी मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर ही जागा महापालिकेला बक्षीसपत्र म्हणून देण्यात आल्याचे लक्षात आले. आयुक्तांनी भूमी व मालमत्ता विभाग आणि सहायक नगररचना विभागाला अशा बक्षीसपत्र जागांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. भूमी व मालमत्ता विभागाने एकूण ५२ जागांची यादी सादर केली. याबाबत अहवाल तयार करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यात विलंब झाला. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली.

निवृत्त अधिकाºयाकडून घेतले सहकार्य - या संपूर्ण प्रकरणाची माहिती नगर भूमापन कार्यालयातून निवृत्त झालेले सिद्राम तुपदोळकर यांना होती. त्यामुळे त्यांची मदत घेण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. ढाकणे यांनी घेतला. तुपदोळकर आणि भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयांनी जुनी कब्जा पावती शोधणे, मोजणी नकाशे आणि टीपी चारचे नकाशे शोधून प्रत्येक मिळकतीचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आला. आयुक्तांच्या सहीने तो जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. 

महापालिकेने या जागांबाबत सुरू केली कार्यवाही- फॅसिलिटी सेंटर, तुळजापूर रोड नाका, साईट फॉर टान्नूरी, फायर ब्रिगेड, कम्युनिटी फॅसिलिटी सेंटर, जकात नाका, स्टोअर डिस्पेन्सरी अँड लायब्ररी, बार्शी रोड नाका, स्कूल अँड प्ले ग्राऊंड, कारंबा स्मशानभूमी, पुणे रोड नाका, हिंदू स्मशानभूमी, प्लॉट नं. १०६ येथील शाळा आरक्षित जागा, हिरज रोड नाका, प्लॉट नं. १३५ प्ले ग्राऊंड आरक्षण, प्लॉट नं. १३६ मार्केट, दक्षिण मध्य रेल्वे नाका, म्युनिसीपल सब आॅफिस, वांगी रोड नाका, ख्रिश्चन स्मशानभूमी, इंडियन ख्र्रिस्त स्मशानभूमी, बाहाई स्मशानभूमी, विजापूर रोड नाका, कंबर तलाव. 

टीपी ४ मधील २७ मिळकती अर्थात ११० एकर जागा आता प्रत्यक्षात महापालिकेच्या मालकीची झाली आहे. उर्वरित २५ मिळकतीही ताब्यात येतील. आज ही प्रक्रिया झाली नसती तर उद्या ती इतरांच्या ताब्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.  कंबर तलावाच्या उताºयावर मनपाचे नाव नसल्याने शासनाकडे एखादा प्रस्ताव पाठवायचा म्हटले तरी अडचण यायची. अशा इतर जागांवरील अडचणी आता दूर होत आहेत. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यामुळे सोलापूर महापालिकेला जवळपास ६०० कोटी रुपयांचा फायदा झाला असे म्हणता येईल.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका