शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे आमदार प्रशांत परिचारकाच्या संस्थेवर सोलापूर जिल्हा बँकेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:04 IST

थकलेले २२.५५ कोटी रूपये कर्ज भरले नसल्याने पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला असून, आता प्रत्यक्षात ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली जाणार आहे. 

ठळक मुद्देताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली जाणारसंचालकांच्या शैक्षणिक संस्थांना कर्जाची खिरापत वाटलीआणखीन एक संस्था रडारवर....

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : थकलेले २२.५५ कोटी रूपये कर्ज भरले नसल्याने पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला असून, आता प्रत्यक्षात ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली जाणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २००७-०८ व ०८-०९ या कालावधीत मोठमोठी कर्जे वाटप केली. शैक्षणिक संस्थांना कर्ज देण्यासाठी बँकेने पोटनियमात दुरुस्ती करुन संचालकांच्या शैक्षणिक संस्थांना कर्जाची खिरापत वाटली. या संचालकांनी सुरुवातीला  कर्जाचे काही हप्ते भरले मात्र नंतर पैसे भरण्याकडे पाठ फिरवली. शेतकरी, साखर कारखाने दुष्काळामुळे अडचणीत असल्याने कर्ज थकबाकी वाढली, असे कारण सांगितले जाते परंतु अनुदानावर चालणाºया शैक्षणिक संस्थांकडेही मोठी थकबाकी वाढली आहे. याची काही केल्या वसुली होत नसल्याने आता जिल्हा बँकेने या संस्था चालकांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमदार प्रशांत परिचारक संचालक असलेल्या शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या आ. परिचारक, सालेरभाई भोहरी, किसन निंबे, महेश परिचारक, अनिरुद्ध सालविठ्ठल व सुरेश आगावणे यांना थकबाकीची २२ कोटी ५५ लाख ९३ हजार ४२२ रुपये  ६० दिवसात भरण्याची नोटीस १७ मे २०१७ रोजी  पाठवली होती. १५ जानेवारी १७ अखेरच्या थकबाकीवर संचालकांनी अद्यापही रक्कम न भरल्याने आता सरफेशी कायद्यानुसार संचालकांची शेतजमीन व शैक्षणिक इमारतीचा ताबा घेण्याची प्रतिकात्मक नोटीस बँकेने बजावली आहे. यामध्ये शेळवे येथील २० हेक्टरहून अधिक शेतजमिनीचा समावेश आहे. प्रतिकात्मक नोटीस मिळाल्यानंतर एक महिन्यात पैसे भरले नाही तर प्रत्यक्ष ताबा घेऊन त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया करण्यात येते. यासाठी आता जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव दिला जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.----------------आणखीन एक संस्था रडारवर....- सोलापूर जिल्ह्यातील आणखीन एका बड्या नेत्याच्या शैक्षणिक संस्थेवर थकबाकीमुळे कारवाई करण्याची नोटीस बजावली असून तारण मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बँक थकबाकीदार संचालकांवर कारवाई करीत असली तरी त्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने वसुलीवर परिणाम होत आहे.