शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेच्या चार कर्मचाºयांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:39 IST

कार्यकारी समिती सभा संपन्न, १९ विषयांना बहुमताने मिळाली मंजुरी

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीची सभा राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालीएस. बी. म्हमाणे या वाहनचालकाला गैरवर्तनामुळे निलंबित करण्यात आले

सोलापूर: गैरवर्तन करणाºया एकाचे निलंबन, एकाची बडतर्फी, एकाची खातेनिहाय चौकशी तर एकाचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीने घेतला. समितीने १९ विषयांना मंजुरी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीची सभा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला संचालक आमदार बबनराव शिंदे, संचालिका सुनंदा बाबर, सुभाष शेळके व भारत सुतकर उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील वांगी-३ शाखेतील लिपिक डी. बी. तांबवे यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला.

वाहनचालक एस. बी. म्हमाणे या वाहनचालकाला गैरवर्तनामुळे निलंबित करण्यात आले असून, कार्यकारी समितीने त्यास मान्यता दिली. सांगोला शाखेतील शिपाई एस. आर. वाईकर याची खातेनिहाय चौकशी करण्यात आली असून, त्यात दोषी आढळल्याने त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा विषय कार्यकारी समितीसमोर ठेवला होता. त्यास मान्यता देण्यात आली. शेती कर्ज विभागातील अधिकारी एम. व्ही. रेडे यांनी पंढरपूर शाखेत असताना हेड शाखेतून पाठविलेले १८ कोटी रुपये स्टेट  बँकेतून काढले. परंतु ते मुख्यालयाला कळविले नाही. ६० दिवसांचा ८ टक्के व्याजाचा भुर्दंड बँकेला सोसावा लागला. यामुळे रेडे यांची खातेनिहाय चौकशी झाली असून, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे. 

३५ लाख भरणारे न्यायालयात- रोपळे (प) शाखेतील बडतर्फ कर्मचारी एस. ए. कदम यांनी अपहाराची ३५ लाख ८६ हजार ८०० रुपये इतकी रक्कम भरणा केली असून, त्यांच्याकडे व्याजाची १८ लाख एक हजार ११६ रुपये येणेबाकी आहे. कदम हे मागील तीन महिन्यांपासून कामावरही नाहीत. बडतर्फीला कदम याशिवाय बडतर्फ शिपाई पी. डी. सातपुते यांनीही कामगार न्यायालयात बँकेविरोधात दाद मागितली असल्याने हा विषय कार्यकारी समितीसमोर आला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र