शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी

By appasaheb.patil | Updated: December 21, 2023 14:19 IST

या अपघातात जयजयराम काशीराम शिंदे ( वय-३५ दाताळा तालुका सेनगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

लक्ष्मण कांबळे/कुर्डूवाडी

हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरात देवाच्या ठिकाणी घरातील एका व्यक्तीच्या असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी वरूड (ता.शेनगाव) येथून एका खाजगी टेम्पोतून प्रवास करत असतानाच बावी (ता.माढा जि. सोलापूर) येथील सिध्देश्वर मंदिराजवळ पोहचली असता चालकाला लागलेल्या डुलकीमुळे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने त्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल १३ जण यात जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात जयजयराम काशीराम शिंदे ( वय-३५ दाताळा तालुका सेनगाव) यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे सदरचे घटना घडल्यानंतर अपघातातील एका जखमी व्यक्तीने १०८ या क्रमांकावर  संपर्क साधला. त्यामुळे शेटफळ व कुर्डूवाडी येथील ॲम्बुलन्स घटनास्थळावरती अर्ध्या तासात पोहोच झाल्या. त्यातून जखमींना कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. त्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, डॉ प्रद्युम्न सातव यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यातील काहीजण गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलला  हलविण्यात आले.

या घटनास्थळाला कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली.यात जखमी अर्चना केळे ( वय २२ रा.जानरुण रोडगे), देहुबाई ज्ञानोबा दरोगे (वय ५० रा.दाताळा ता.सेनगाव), प्रभावती जयजयराम शिंदे (वय ३० दाताळा ता.सेनगाव), कानबा अंबर दरोगे (वय ६० रा.दाताळा ता.सेनगाव), ज्ञानेश्वर विठ्ठल केळे (वय २७ रा.जानरुण रोडगे), भास्कर गेनुजी गाडे (वय ४० रिधोरा ता.सेनगाव), सुधाकर दाजिबा कोटकर (वय ५० वरुड ता.सेनगाव), सरस्वती गजानन शिंदे( वय ३० रा.दाताळा ता.सेनगाव), रूक्मिणी विठ्ठल केळे (रा.कंकरवाडी ता.सेनगाव), चंद्रभागा संतोष नलवडे (वय ३४ तरडगाव ता.सेनगाव), प्रयागाबाई संजय सरकटे (वय ४० रा.समगा ता.सेनगाव), गजानन कौतिका शिंदे (वय ३६ रा.दाताळा ता.सेनगाव) अशी आहेत.