पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे रविवारी सकाळी अपघात झाला असून यामध्ये एक वयस्कर महिला व लहान वर्षाचा मुलगा मयत झाला आहे.तर २३ जण जखमी झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील कामशेत या गावातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते. यादरम्यान भटुंबरे (ता. पंढरपूर) येथे भाविकांच्या बसची ट्रकबरोबर धडक झाली आहे. यामध्ये बेबाबाई सोपान म्हाळसकर (वय ६५, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) व जानवी उर्फ धनु विठ्ठल म्हाळसकर (वय ११, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर २५ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोउपनि. भारत भोसले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. बसमधील मयत व जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.