सोलापूर: कला केंद्रातील एक नर्तकीला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार करीत शिवीगाळ अन मारहाण केली. ही घटना एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान घडली असून याबाबत पीडित महिलेने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल अंकुश भिसे (रा.पानगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित महिला कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करते. सन २०१६ मध्ये बार्शी येथील कला केंद्रात काम करत असताना नाचकाम पाहण्यासाठी राहूल यायचा. यातून दोघांची ओळख झाली. भिसे यांने नर्तकीला तु कला केंद्रात नाचू नको, मला ते आवडत नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणत कार गाडीतून फिरायला नेत असत.
एप्रिल २०१६ मध्ये बार्शी येथील कला केंद्रात असताना राहुल भिसे आला. त्याने कारमध्ये बसवून नर्तकीस गाडेगाव रोडवर आणले. एका खडी क्रेशरजवळ रात्री आठ वाजता कार थांबवून लग्न करण्याची ग्वाही देत अत्याचार केला. त्यानंतर घरी सोडविण्यास जात असताना कुर्डूवाडीच्या अलीकडे एका पेट्रोल पंपाच्या बाजूला लाॅजवर नेऊन अत्याचार केला. याशिवाय ती राहत्या घरी आणि येडशी टोल नाक्याच्या अलीकडे कार थांबवून अत्याचार केला. फसवणूक झाल्याचे समजताच तिने पोलीस ठाणे गाठले.